Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-18T05:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Campus Placement: टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलतर्फे ६० हजार महिलांची भरती Rojgar News

Advertisement
Campus Placement : देशातील प्रमुख आयटी कंपन्या हल्ली कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट चालवत आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटद्वारे, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल, टीसीएसमध्ये या वर्षाच्या अखेरीस सुमारे ६० हजार महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या कंपन्या महिला फ्रेशर्स उमेदवाराची नियुक्ती करत आहेत आणि यापुढेही करणार आहेत. यासाठी कंपन्यांकडून वेगळा प्लान तयार करण्यात आला आहे. सर्व नियुक्त्या एंट्री लेव्हलच्या असणार आहेत. उद्योग संस्था नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार भारतातील आयटी उद्योगामध्ये सध्या जेंडर कम्पालयन्स ३३ टक्के आहे. महिलांना TCS मध्ये १८ हजार पगार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये एन्ट्री लेवलसाठी ३८ ते ४५ टक्के महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या फ्रेशर्स महिला उमेदवारांना १५ हजार ते १८ हजारपर्यंत पगार दिला जाईल. सध्या कंपनीमध्ये १.८५ लाख महिला कर्मचारी आहेत. HCL तर्फे २२ हजार नियुक्त्या एचसीएल कंपनीने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे या वर्षाच्या अखेरीस २२ हजार नवीन उमेदवारांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेल्या या आयटी फर्मने आपल्या नियुक्त्यांमध्ये ६० टक्के महिला उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती एन्ट्री लेव्हलसाठी असणार आहे. विप्रो आणि इन्फोसिसमध्ये २०३० पर्यंत ५० टक्के महिला उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहेत. इन्फोसिस आपल्या कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांच्या ४५ टक्के महिलांना एन्ट्री लेव्हलला काम करण्याची संधी देणार आहे. या कंपनीने ३५ हजार महाविद्यालयीन पदवीधरांना भरती आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्त्यांमध्ये ५० टक्के महिला उमेदवारांसाठी भरती राखीव असेल. विप्रोला कॅम्पसमधून ३० हजार फ्रेशर्सची भरती करायची आहे. यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aOO9zQ
via nmkadda