Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-04T10:43:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षांच्या मार्क्स व्हेरिफिकेशनसाठी आजपासून करा अर्ज Rojgar News

Advertisement
Class 12 Compartment Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सिनिअर सेकेंडरी अर्थात बारावीच्या कम्पार्टमेंट परीक्षांचे निकाल ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केले. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी सीबीएसई रिझल्ट पोर्टलला भेट देऊ शकतात. अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in लावर जाऊन संबंधित लॉटसाठी दिलेल्या लिंकवरून उमेदवार त्यांचे कंपार्टमेंट निकाल तपासू शकतात. दुसरीकडे मंडळाने विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपार्टमेंटच्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी आणि गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्याची संधी दिली आहे. १ ऑक्टोबर रोजी बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, त्यांच्या कंपार्टमेंट निकालाच्या गुणांबाबत असमाधानी विद्यार्थी ४ ऑक्टोबर २०२१ पासून गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५९ पर्यंत सुरू राहील. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. मंडळाच्या नोटिफिकेशननुसार उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू होतील. विद्यार्थी १४ ऑक्टोबर २०२१ रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करू शकतील. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना १८ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२१ रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करु शकतील. विद्यार्थी उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतील तेव्हाच कंपार्टमेंट गुणांच्या पडताळणीसाठी देखील अर्ज करु शकतील. प्रक्रिया आणि शुल्क जाणून घ्या सीबीएसई बोर्ड कम्पार्टमेंट मार्क व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या लेटेस्ट सेक्शनमध्ये अॅक्टीव्ह केल्या जाणाऱ्या लिंकवर क्लिक करुन अर्जाच्या पेजवर पोहोचता येईल. मागितलेली माहिती भरुन ऑनलाइन अर्ज पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांना मार्क्स व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येक विषयाला ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे पेमेंट ऑनलाइन (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग इ.) माध्यमातून करावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3isfYSM
via nmkadda