Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T13:43:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE टर्म १ परीक्षेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी Rojgar News

Advertisement
CBSE Board Term 1 Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे टर्म १ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आता सीबीएसईकडून आलेल्या नव्य अपडेटनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रात (CBSE Term 1 Exam Centre) बदल करता येऊ शकतो. सीबीएसईच्या नोटिसनुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा असलेल्या ठिकाणी सध्या नाहीत असे निदर्शनास आले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची सुविधा दिली जाईल. विद्यार्थ्यांनी केव्हा आपल्या शाळांशी संपर्क साधायचा याचा तपशली सीबीएसईकडून देण्यात आला आहे. असा तयार होणार बोर्ड परीक्षेचा निकाल बोर्ड परीक्षेचा निकाल कसा तयार होईल याबद्दल परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी (NEP)च्या शिफारशींचे पालन करीत आहोत. म्हणून आम्ही २ टर्म मध्ये परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. टर्म १ हा वस्तुनिष्ठ प्रकार असेल आणि टर्म २ सब्जेक्टिव्ह असेल असे भारद्वाज म्हणाले. 'अंतिम निकाल दोन्ही अटींवर आधारित असेल. पण जर टर्म २ महामारीमुळे झाली नाही तर टर्म १ नुसार निकाल तयार करण्यात येईल. टर्म २ देताना कुठे सुधारणा करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यास विद्यार्थ्यांना टर्म १ मुळे मदत होणार आहे. सीबीएसईतर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दहावी आणि बारावीसाठी प्रथमच ऑफलाइन बोर्ड परीक्षा घेणार आहे. सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर वेळापत्रक तपासू शकतात. यावर्षी सीबीएसई मागील वर्षी प्रमाणे एका वार्षिक परीक्षा पद्धतीऐवजी दोन बोर्ड परीक्षा घेणार आहे. टर्म १ परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकार असेल. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटे असेल. हिवाळ्याच्या हंगामामुळे परीक्षा सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील. दहावीच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून सुरू होतील आणि ११ डिसेंबरला संपतील, तर बारावीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होतील आणि २२ डिसेंबरला संपतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jfEeI0
via nmkadda