CBSE टर्म १ ची परीक्षा नोव्हेंबरपासून, वेळापत्रकाबद्दल महत्वाची अपडेट Rojgar News

CBSE टर्म १ ची परीक्षा नोव्हेंबरपासून, वेळापत्रकाबद्दल महत्वाची अपडेट Rojgar News

Term 1 Board Exam 2022: दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२२ दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिली टर्म नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये होणार आहे. मंडळातर्फे या महिन्यात परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbse.nic.in वर जाहीर केले जाणार आहे. टर्म २ ची परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. टर्म १ परीक्षेचे आयोजन ४ ते ८ आठवड्यांमध्ये केले जाईल. सीबीएसई शाळांनी आधीच बोर्ड परीक्षांसाठी उमेदवारांची यादी सादर केली आहे. सीबीएसई टर्म १ बोर्ड परीक्षेतील प्रश्नपत्रिकांमध्ये मल्टीपल चॉईस प्रश्न (MCQ) असतील. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. प्रत्येक टर्ममध्ये ५० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश करेल. बोर्डाच्या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी सुधारित अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात. CBSE टर्मवाइज अभ्यासक्रम २०२२: थेट लिंक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)दहावीचा पेपर नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार असेल. पेपरमधील क्षमता प्रश्नांची संख्याही वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने २०२० मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले. नवीन शैक्षणिक धोरणात देशातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदलांची शिफारस करण्यात आली आहे. त्यानंतर नवीन शिक्षण धोरणाच्या तरतुदी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केल्या जात आहेत. सीबीएसईने दहावीच्या पेपरमध्येही याच क्रमाने बदल केले आहेत. सीबीएसई टर्म १ बोर्ड परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. बोर्डाने नुकतीच सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी नमुना प्रश्नपत्रिका म्हणजेच सॅम्पल क्वेश्चन पेपर जारी केले आहेत. केंद्रीय मंडळाने, परीक्षांच्या नवीन योजनेनुसार, सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२२ टर्म १ साठी नमुना पेपर जारी केले आहेत, या परीक्षा नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. दहावी, बारावी या दोन्हीसाठी नमुना पेपर जारी करण्यात आले असून त्या नमुना पेपर्सची थेट लिंक या वृत्तात खाली दिलेली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी कृपया लक्षात घ्या की, यावर्षी पासून, कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, सीबीएसई अभ्यासक्रम दोन समान सत्रांमध्ये विभागला आहे - टर्म १ आणि टर्म २. टर्म १ हा एमसीक्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल आणि ५० % अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाईन (परिस्थितीनुसार) घेतली जाईल आणि प्रश्नपत्रिका मंडळाद्वारे उपलब्ध केल्या जातील. चार प्रकारच्या परिस्थितीनुसार अंतिम परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, त्यावेळी सीबीएसई बोर्ड टर्म १ परीक्षेचे गुण अंतिम सीबीएसई बोर्ड निकाल २०२२ साठी ग्राह्य धरणार आहे. म्हणूनच या पहिल्या सत्राच्या प्रश्नपत्रिका कशा असतील त्याचे विद्यार्थी, शिक्षकांना आकलन व्हावे, म्हणून बोर्डाने सीबीएसई दहावी आणि बारावीसाठी टर्म I - MCQ आधारित पेपरचे नमुना पेपर जाहीर केले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ainUkN
via nmkadda

0 Response to "CBSE टर्म १ ची परीक्षा नोव्हेंबरपासून, वेळापत्रकाबद्दल महत्वाची अपडेट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel