Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-12T06:43:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CMA Foundation परीक्षेची तारीख जाहीर, अर्ज प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

Advertisement
CMA Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) ने CMA फाउंडेशन कोर्सच्या डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. CMA फाउंडेशन परीक्षा डिसेंबर २०२१ साठी संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल. ही परीक्षा प्रत्येकी २ तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी १० वाजता आणि दुसरे सत्र दुपारी २ वाजता सुरू होईल. पेपर १ आणि पेपर २ सकाळच्या शिफ्टमध्ये, तर पेपर ३ आणि ४ दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. सीएमए फाउंडेशन परीक्षेत अनेक पर्यायी प्रश्न विचारले जातील आणि विद्यार्थी त्यांच्या लॅपटॉप / कॉम्प्युटर / मोबाईल / टॅबलेटद्वारे घरून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. आयसीएमएआयच्या वेळापत्रक आणि परीक्षा योजनेनुसार, प्रत्येक पेपरमध्ये ५० प्रश्न असतील जे संबंधित विषयातून विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण दिले जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक शिफ्टमध्ये १०० प्रश्न असतील आणि यासाठी एकूण २०० गुण देण्यात आले आहेत. अर्ज सुरू करा ICMAI ने CMA फाउंडेशन कोर्स डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे. डिसेंबरच्या परीक्षांना बसू इच्छिणारे विद्यार्थी संस्थेची अधिकृत वेबसाइट icmai.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ICMAI ने डिसेंबर परीक्षेला अर्ज करण्यासाठी २ नोव्हेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे. परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना १२०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल. जे विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तसेच, ICMAI च्या सूचनेनुसार, जे विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतील त्यांनाच उपस्थित राहण्याची संधी दिली जाईल. ICMAI ने आपल्या नोटिसमध्ये केलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संस्थेच्या वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील कोणतीही अपडेट कळत राहीलं.कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांनी अधिकृत ईमेल आयडी exam.helpdesk@icmai.in वर मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीए डिसेंबर २०२१ ची नोंदणी सीए डिसेंबर २०२१ परीक्षा नोंदणी विंडो २ दिवसांसाठी पुन्हा उघडण्याबाबत आयसीएआयने नोटीस जाहीर केली आहे. यानुसार या दोन दिवसांच्या कालावधीत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये विलंब शुल्कही भरावे लागेल. परीक्षेसाठी निर्धारित शुल्काव्यतिरिक्त हे शुल्क परीक्षेसाठी आकारले जाईल. ऑनलाईन नोंदणी दरम्यान विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क आणि विलंब शुल्क भरू शकतील. त्यानुसार, करोनाची स्थिति ध्यानात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चार्टर्ड अकाउंटन्ट्स अंतिम, इंटरमिडिएट, फाउंडेशन, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सेसच्या डिसेंबर २०२१ साठी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रात्री ११.५९ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AAP2X3
via nmkadda