CS Exam 2022: ICSI कडून CS फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News

CS Exam 2022: ICSI कडून CS फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News

2022: सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने CS फाउंडेशन परीक्षेची तारखांची ९ ऑक्टोबर २०२१ रोजी घोषणा केली आहे. यानुसार ही परीक्षा ३ आणि ४ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट .edu वर नोटिफिकेशन तपासून डाउनलोड करू शकतात. परीक्षेचे वेळापत्रक ३ जानेवारी २०२२- पेपर वन बिझनेस एन्व्हायर्नमेंट आणि पेपर II - बिझनेस मॅनेजमेंट, एथिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप ४ जानेवारी २०२२ - पेपर II - बिझनेस इकॉनॉमिक्स आणि पेपर IV फंडामेंटल्स ऑफ अकाऊंटिंग अॅण्ड ऑडिटिंग सीएस फाउंडेशन परीक्षा २०२२ कॉम्प्युटर आधारित टेस्ट किंवा सीबीटी मोडद्वारे घेतली जाईल. याअंतर्गत उमेदवार कुठूनही परीक्षा देऊ शकतील आणि रिमोट प्रोक्टोरिंगद्वारे त्यांचे निरीक्षण केले जाईल. ICSI CS फाउंडेशनची परीक्षा दोन्ही दिवशी चार शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. उमेदवारांना देण्यात आलेल्या शिफ्टमध्ये उपस्थित राहावे लागेल. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते सकाळी ११, दुपारी १२ ते १.३०, दुपारी २.३० ते ४ आणि संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत घेतली जाईल. उमेदवारांनी परीक्षा वेळेवर सुरू करावी जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. त्यांच्याकडे परीक्षेसाठी स्थिर आणि मजबूत इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. ICSI CS Exam timetable: असे करा डाऊनलोड ICSI CS फाउंडेशन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या नवीन लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पेज खुले होईल. तिथे ICSI फाउंडेशन परीक्षा २०२१ तारखांची लिंक उपलब्ध होईल. त्यावर क्लिक करा. आता वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल. वेळापत्रक तपासा आणि पेज डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट स्वत:कडे ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iNNumC
via nmkadda

0 Response to "CS Exam 2022: ICSI कडून CS फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel