Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-19T13:43:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CSEET January 2022: कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरु Rojgar News

Advertisement
CSEET : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार ICSI तर्फे कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) मध्ये उपस्थित होण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. CSEET जानेवारी २०२२ सत्र प्रवेश परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन नोंदणी करु शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटवरील CSEET सेक्शनमध्ये जाऊन नोंदणी अर्ज भरायचा आहे. CSEET जानेवारी २०२२ सत्रासाठी १५ डिसेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. ८ जानेवारी २०२१ रोजी संस्थेतर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. जानेवारी २०२२ साठी पात्रता निकष जानेवारी 2022 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे घेण्यात येणाऱ्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट देण्यासाठी पात्रता निकष पूर्ण असणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून सिनिअर सेकेंडरी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा २०२१-२२ मध्ये परीक्षा देणारे किंवा त्या समकक्ष शिक्षण असलेले विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. आयसीएसआय फाउंडेशन/ आयसीएआय फायनल/आयसीएमएआय फायनलय/ कोणत्याही विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या परीक्षांमध्ये त्यांना किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. त्यांना सीएसईईटी प्रवेश परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. असे विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी थेट नावनोंदणी करू शकतात. CSEET January 2022: अशी करा नोंदणी सीएसईईटी जानेवारी २०२२ च्या सत्रात उपस्थित राहण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. सीएसईईटी सेक्शनमध्ये किंवा होमपेजवरील व्हाट्स न्यू सेक्शनमध्ये जा. या विभागात CSEET जानेवारी २०२२ सत्रासाठी नोटीस आणि नोंदणीची लिंक दिली आहेत. अर्जादरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे फोटो, सही आणि कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल. अर्ज भरल्यावर भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pdialf
via nmkadda