Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-28T09:43:17Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे शहर बदलण्यासाठी विंडो खुली Rojgar News

Advertisement
2021: केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) परीक्षेचे शहर बदलण्यासाठी अर्ज विंडो पुन्हा उघडण्याची घोषणा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केली आहे. CTET डिसेंबर २०२१ च्या परीक्षेसाठी याआधी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचे शहर बदलता येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन हा बदल करता येणार आहे. ने परीक्षेचे शहर बदलण्यासाठी अर्ज विंडो ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत खुली ठेवण्याची घोषणा केली आहे. परीक्षेचे शहर असे बदला उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा शहरात सुधारणा करण्यासाठी परीक्षा पोर्टलवर जा. होमपेजवर दिलेल्या 'सीटीईटी डिसेंबर २०२१ साठी अर्ज करा' या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज खुले होईल. त्यावर उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड हा तपशील भरुन लॉगिन करा.यानंतर उमेदवार त्यांनी आधी निवडलेल्या शहरात बदल करु शकतात. CBSE ने डिसेंबर २०२१ च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लेह येथे अतिरिक्त परीक्षा केंद्राची घोषणा करण्यात आली होती. तसेच १८ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या नोटीसनुसार, परीक्षेचे शहर बदलण्याची आणि अर्ज दुरुस्तीची संधी देणार असल्याचेही म्हटले होते. यापूर्वी CTET परीक्षेसाठी २० सप्टेंबर २०२१ पासून अर्ज सुरू झाले होते. त्यानंतर याला मुदतवाढ देण्यात आली आणि २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. ३ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज सीबीएसईने जाहीर केलेल्या ताज्या सीटीईटी २०२१ च्या वेळापत्रकानुसार, उमेदवार आता २८ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांच्या ऑनलाइन अर्जात सुधारणा करू शकतील. ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत CTET २०२१ अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी विंडो खुली ठेवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. यापूर्वी अर्ज दुरुस्तीची विंडो २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत खुली राहणार होती. एका पेपरसाठी १ हजार आणि दोन्हीसाठी १२०० रुपये शुल्क सीबीएसईद्वारे सीटीईटी परीक्षमध्ये दोन पेपर घेतले जातात. पहिली ते पाचवीच्या इयत्तांचे शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पेपर १ मध्ये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी उमेदवारांना पेपर २ मध्ये उपस्थित राहावे लागेल. सीबीएसई CTET २०२१ च्या नोटीसनुसार, एका पेपरसाठी (पहिली किंवा दुसरी) परीक्षा फी १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर दोन्ही पेपरसाठी एकूण १२०० रुपये भरावे लागतील. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोन्ही पेपरची फी फक्त ६०० रुपये आहे. CTET परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे.सीबीएसईने जाहीर केलेल्या सीटीईटी २०२१ माहिती बुलेटिन आणि १७ सप्टेंबर २०२१ च्या नोटिसनुसार, सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना घेण्यात येणार आहे. बोर्डाद्वारे उमेदवारांना दिलेल्या CET २०२१ प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि वेळेबद्दल माहिती मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vQCTwi
via nmkadda