Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-10-21T12:43:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

DRDO मध्ये विविध पदांची भरती, पदवीधरांना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
DRDO : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण ११० पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://rac.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी उमेदवारांना १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जाची शेवटची तारीख गेल्यावर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही. डीआरडीओने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण ११० पदांपैकी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या ५० आणि टेक्निशियन डिप्लोमा पदाच्या ३० पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर ट्रेड अप्रेंटिसच्या २६ पदांवर भरती होणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, जाहीर करण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या कमी जास्त केली जाऊ शकते. आलेल्या अर्जानंतर अंतिम मुल्यांकन करुन यात बदल केला जाऊ शकतो. अशा प्रकारे होईल निवड अप्रेंटिस पदांवर उमेदवारांची निवड पदवी परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीच्या आधारावर केली जाणार आहे. यामध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू होताना 'वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र' सादर करावे लागणार आहे. उमेदवारांना मुलाखतीला येताना मोबाईल/पेन ड्राइव्ह/लॅपटॉप/इलेक्ट्रॉनिक उपकरणे/कॅमेरा आणण्याची परवानगी नसेल. निवडलेल्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी १२ महिन्यांचा असेल. लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी प्रवेशपत्रासंदर्भातील माहिती लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केली जाणार आहे. उमेदवारांना लेखी चाचणी किंवा मुलाखत कॉल लेटरची कोणतीही हार्डकॉपी पाठवली जाणार नाही. नोटिफिकेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रवेशपत्र/कॉल लेटर प्राप्त करणे, डाउनलोड करणे आणि प्रिंट करणे ही उमेदवाराची जबाबदारी असेल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. गेट आणि नेट परीक्षा क्वालिफाय तरुणांसाठी भरती डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO)ने गेट आणि नेट परीक्षा क्वालिफाय करणाऱ्या तरुणांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार DRDO ची अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर ऑनलाइन नोटिफिकेशन वाचू शकतात आणि नंतर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरातीच्या तारखेनंतर ३० दिवसांची आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जेआरएफ पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांनी एमएससी, एमटेक, नेट आणि गेट क्वालिफाय असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आरए पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पीएचडी किंवा समकक्ष डिग्री किंवा एमएससी/एमई/एमटेक नंतर सायन्स साइटेशन इंडेक्सेड (एससीआई) जर्नल मध्ये कमीत कमी एक संशोधन पेपर असायला हवा. या व्यतिरिक्त अध्यापनाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून फॉर्म डाऊनलोड करावा आणि भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह निदेशक, रक्षा खाद्य अनुसंधान प्रयोगशाला, सिद्धार्थ नगर, म्हैसूर- ५७००११ या पत्त्यावर स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवायचे आहेत. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना डिफेंस फूड रिसर्च लॅबोरेटरी (Defence Food Research Laboratory) म्हैसूर मध्ये लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी बोलावले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सूचना ई-मेल आणि स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवल्या जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZbEWyH
via nmkadda