DU Cut off List 2021: राज्य मंडळाच्या विषयांतील प्रवेशासंदर्भात महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News

DU Cut off List 2021: राज्य मंडळाच्या विषयांतील प्रवेशासंदर्भात महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News

दिल्ली विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या कॉलेजच्या प्रवेशाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे या प्रवेशाची कट ऑफ जाहीर करताना दिल्ली विद्यापीठाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या इतर राज्य मंडळांचे विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य बोर्डांचे कोणते विषय सीबीएसई विषयांच्या बरोबरीचे असतील, कट ऑफ स्कोअर मोजताना त्यांचा समावेश आणि सर्वोत्तम-चार गुणांची सरासरी ही समिती ठरवणार आहे. 'जर समितीला वाटत असेल की एखादा विषय समकक्ष नाही, तर तो सर्वोत्कृष्ट चारमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही' असे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेचे अध्यक्ष राजीव गुप्ता म्हणाले. याविषयी कॉलेजांसोबत बैठक झाली आणि समितीकडे कॉलेजांची यादी देण्यात आली. सीबीएसईने गणित विषयात पारंगत नसलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अप्लाइड गणित आणले आहे. याचा अर्थ गणितापेक्षा ते सोपे आहे. अप्लाइड मॅथेमॅटिक्सचे विद्यार्थी भौतिकशास्त्र (Physics), केमिस्ट्री (Chemistry) (ऑनर्स) आणि गणित (Maths) (ऑनर्स) साठी पात्र राहणार नाहीत असेही सीबीएसईने म्हटले आहे. त्या अप्लाइड मॅथेमॅटिक्सचा अर्थशास्त्र (ऑनर्स) साठी विचार केला जाऊ शकत नाही कारण या अभ्यासक्रमाला गणिताच्या कठीण पातळीची आवश्यकता आहे, पण बी.कॉम (ऑनर्स) साठी विचार केला जाऊ शकतो', असे उदाहरण गुप्ता यांनी दिले. निर्णय घेताना सिद्धांत आणि व्यावहारिक घटक, अभ्यासक्रम इत्यादी घटकांचा विचार समिती करत आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात गणित आणि सांख्यिकी हा विषय आहे, ज्याला मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीबीएसई गणिताच्या बरोबरीने मानले जाईल. नागालँड शालेय शिक्षण मंडळाच्या व्यवसाय गणिताची मूलभूत तत्त्वे देखील सीबीएसई गणिताच्या बरोबरीने मानली जातील. त्याचप्रमाणे, बिहार बोर्डात हिंदी आणि इंग्रजी विषयांसाठी १०० गुणांच्या पेपर व्यतिरिक्त, ५०-५- गुणांचे पेपर देखील आहेत. समितीने म्हटले आहे की, डीयू महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वोत्तम चार सरासरी मोजण्यासाठी ५० गुणांचा पेपर विचारात घेतला जाणार नाही. त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, केरळ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिकवलेले अकाउंटन्सी विथ कॉम्प्युटर अकाउंटिंग हा विषय सीबीएसईच्या बिझनेस स्टडीजच्या बरोबरीने मानला जाणार नाही. तसेच मध्य प्रदेश बिझनेस इकॉनॉमिक्सचा पेपर सीबीएसई इकॉनॉमिक्सच्या बरोबरीने विचारात घेतला जाणार नाही असेही यात म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uUcOvQ
via nmkadda

0 Response to "DU Cut off List 2021: राज्य मंडळाच्या विषयांतील प्रवेशासंदर्भात महत्वाचे निर्देश जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel