Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-28T08:43:16Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Dual Bachelor Degree: ४ वर्षांत मिळणार ग्रॅज्युएशन-बीएड पदवी Rojgar News

Advertisement
In Teaching: शिक्षण मंत्रालयाने चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम () जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत अध्यापन क्षेत्रात (Teaching Field) करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्युअल बॅचलर डिग्री (Dual Bachelor Degree) मिळू शकणार आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल. या अंतर्गत विद्यार्थ्यांना बी.ए. बी.एड./बी.एस.सी. बी.एड. आणि बी.कॉम. बी.एड. (B.A. B.Ed./ B. Sc. B. Ed./B.Com. B.Ed)या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश दिला जाईल. सुरुवातीला हा अभ्यासक्रम प्रायोगिक स्तरावर चालवला जाईल. पण २०३० पासून आयटीईपीद्वारे शिक्षकांची भरती केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अशा अभ्यासक्रमाची शिफारस करण्यात आली होती. माध्यमिक शिक्षणानंतर अध्यापन क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याची मदत होणार आहे. अध्यापन क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएड करण्यासाठी पहिली तीन वर्षे पदवीचे शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर दोन वर्षांचा बी.एड कोर्स करावा लागतो. नवीन प्रणालीनुसार विद्यार्थी एकाच वेळी पदवी आणि बीएडचा अभ्यास करू शकणार आहे. आणि बीए़डची डिग्री ५ ऐवजी ४ वर्षात पूर्ण करु शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना बी.ए. बी.एड./बी.एस.सी. , बी.एड. आणि बी.कॉम. बी.एड.ची ड्यूल बॅचलर पदवी एकत्र मिळू शकणार आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेता येणार आहे. सुरुवातीला ५० संस्थामध्ये अभ्यासक्रम शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सुरुवातीला ५० संस्थांद्वारे दुहेरी पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. जो पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू असेल. नवीन अभ्यासक्रमांतर्गत, एनसीटीईने इतिहास, गणित, विज्ञान, कला, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य यासारख्या विशेष विषयांसाठी अभ्यासक्रमांच्या केलेल्या रचनेनुसार विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या पदवीसोबतच इतर विषयांची पदवी मिळू शकणार आहे. चार वर्षांच्या ITEP ची सुरुवात शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून होणार आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट (NCET)च्या माध्यमातून होणार आहेत. २०३० पासून फक्त ITEP द्वारे शिक्षकांची भरती शिक्षण विभागाकडून आलेल्या माहितीनुसार २०३० पासून शिक्षकांची भरती केवळ ITEP द्वारे केली जाईल. ITEP मुळे अत्याधुनिक अध्यापनशास्त्र शिकण्यात मदत होणार आहे. तसेच बाल संगोपन आणि शिक्षण (ECCE), मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, सर्वसमावेशक शिक्षण, भारत आणि त्यातील मूल्ये/आचार/कला/परंपरा यांची समज विकसित होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nuwN0M
via nmkadda