Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T07:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

DUET PG उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट जाहीर, 'येथे' करा डाऊनलोड Rojgar News

Advertisement
DUET 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने दिल्ली युनिव्हर्सिची एन्ट्रन्स टेस्ट (DUET) PG ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. मास्टर प्रोग्रामच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर आवश्यक माहिती भरुन त्यांचे गुण तपासू शकतात. उत्तरतालिकेसोबत ने उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका देखील प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. Answer Key 2021: उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट अशी करा डाऊनलोड पीजी उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in ला भेट द्या. हेडर मेनूवर उपलब्ध असलेल्या 'स्टुडन्ट' सेक्शनमध्ये जा. दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET) पर्याय निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा. PG उत्तरतालिकेमध्ये लॉगिन करण्यासाठी फॉर्म क्रमांक आणि जन्मतारीख भरा. उत्तरतालिका आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीटची प्रिंट घ्या. यावर काही आक्षेप असल्यास अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक रक्कम भरुन आक्षेप नोंदवा. एनटीएने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार तात्पुरती उत्तरतालिका, उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइटवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. उत्तर योग्यरित्या तपासले गेले नाही असे उमेदवारांना वाटत असेल तर ते यावर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेपांसाठी उमेदवारांना २०० रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. समितीने कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे प्रश्न वगळण्याचा निर्णय घेतला आहे तिथे परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना पूर्ण गुण दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त कोणतीही अडचण असल्यास उमेदवार ०११-४०७५९००० या हेल्प डेस्कवर कॉल करु शकतात. किंवा अधिकृत नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे Duet@nta.ac.in वर ईमेल करु शकतात.अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3na0ELX
via nmkadda