Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-19T10:43:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Employment Market 2.0: बेरोजगारांना मिळणार नोकऱ्यांसह कौशल्य विकास आणि करिअर टिप्स Rojgar News

Advertisement
Employment Market 2.0 portal: दिल्ली सरकारतर्फे लवकरच एम्प्लॉयमेंट मार्केट २.० पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर एंट्री लेव्हलच्या नोकऱ्या शोधणे सोपे होईल. यासोबतच दिल्ली सरकार एम्प्लॉयमेंट पोर्टल २.० पोर्टल आणि अॅपच्या माध्यमातून तरुणांना नोकरीसाठी आणि त्यांच्या करिअरसाठी तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याबाबत सल्ला देणार आहे. या व्यतिरिक्त, एम्प्लॉयमेंट मार्केट २.० मधील प्रगत अॅडव्हान्स स्किल्स, त्यांच्या प्रोफाइलमधील कौशल्य आणि ऑटोमेटेड एनालिटिक्समुळे तरुणांना नोकरीच्या शोधात मदत होणार आहे. गेल्या वर्षी देखील दिल्ली सरकारकडून एम्प्लॉयमेंट मार्केट १.० पोर्टल सुरू करण्यात आले होते. या पोर्टलच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्या युवकांना त्यांच्या प्रोफाईल आणि अनुभवानुसार नोकऱ्या मिळतात. यासोबतच मोठ्या कंपन्यांपासून ते छोट्या व्यावसायिकांपर्यंत कुशल व्यावसायिकांना देखील त्यांच्या अनुभवानुसार नोकऱ्या मिळतात. एम्प्लॉयमेंट मार्केट १.० पोर्टलवर लाखो तरुणांपासून ते विविध कंपन्यांनी नोंदणी केली. यातून प्रेरित होऊन दिल्ली सरकारने पोर्टलचे अॅडव्हान्स वर्जन आणण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये फ्रेशर उमेदवार देखील सहजतेने नोकरी शोधू शकतील. करिअर आणि सेवा देखील त्यांच्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत. 'एम्प्लॉयमेंट मार्केट १.० पोर्टल गेल्यावर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सुरू करण्यात आले होते. १४ लाख तरुणांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. १० लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या येथे पोस्ट करण्यात आल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. एम्प्लॉयमेंट मार्केट २.० पोर्टलविषयी म्हणाले, आता नोकरीच्या अपडेटसह एम्प्लॉयमेंट मार्केट २.० पोर्टलद्वारे तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन दिले जाईल असेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DVAsve
via nmkadda