FSSAI मध्ये विविध पदांची भरती, सरकारी पदभरतीसाठी करा अर्ज Rojgar News

FSSAI मध्ये विविध पदांची भरती, सरकारी पदभरतीसाठी करा अर्ज Rojgar News

FSSAI 2021: फूड सेफ्टी किंवा मध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात (FSSAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ग्रुप ए आणि आणि इतर असे मिळून एकूण २५४ जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी दोन वेगवेगळ्या जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्राधिकरणाने जाहीर केलेली जाहिरात क्र. DR-03/2021 नुसार, सहाय्यक संचालक आणि उपव्यवस्थापकाच्या एकूण २१ पदांची भरती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी भरती जाहिरात क्र. DR-04/2021 नुसार, तांत्रिक अधिकारी, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (CFSO), सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक आणि इतर पदांच्या एकूण २३३ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याप्रमाणे अर्ज करा इच्छुक आणि पात्र उमेदवार FSSAI च्या अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया ८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उमेदवार ७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्जादरम्यान उमेदवारांना १५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. त्यापैकी ५०० रुपये इंटीमेशन चार्जेस म्हणून घेतले जातील. एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना केवळ इंटिमेशन चार्ज भरावा लागतो आणि त्यांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सूट दिली जाते. उमेदवार ऑनलाईन माध्यमातून फी भरु शकतात. या पदांसाठी भरती प्रिंसिपल मॅनेजर - १ पद असिस्टंट डायरेक्टर - १५ पदे डेप्युटी मॅनेजर - ६ पदे फूड अॅनालिस्ट - ४ पदे टेक्निकल ऑफिसर - १२५ पदे केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी - ३७ पदे असिस्टंट मॅनेजर (IT) - ४ पदे सहाय्यक व्यवस्थापक - ४ पदे सहाय्यक - ३३ पदे हिंदी अनुवादक - १ पद पर्सनल असिस्टंट - १९ पदे आयटी सहाय्यक - ३ पदे कनिष्ठ सहाय्यक ग्रेड १- ३ पदे


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ovweWJ
via nmkadda

0 Response to "FSSAI मध्ये विविध पदांची भरती, सरकारी पदभरतीसाठी करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel