Fyjc Admission: अद्याप ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी Rojgar News

Fyjc Admission: अद्याप ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी Rojgar News

Maharashtra 2021: अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवेश न मिळालेल्या या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. कोणताही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये शिक्षण विभागातर्फे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच शिक्षण विभागांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगपालिका विभागांना अकरावी प्रक्रियेतील FCFS प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार१८ ऑक्टोबर ही या प्रवेश फेरीची शेवटची तारीख होती. पण शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या FCFS प्रवेश फेरीला ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करायचा आहे तर काही विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन फॉर्म भरलेला नाही. दरम्यानच्या काळात काही सुट्ट्या आल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना FCFS प्रवेश फेरी अंतर्गत २१ ऑक्टोबर दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच त्याचदिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अलोटमेंटनंतप प्रवेश निश्चित करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण असलेले सर्व तसेच ATKT विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे दिलेल्या वाढीव वेळेचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. संबंधित शाळांनी यासंदर्भातील निर्देश दर्शनी भागात लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दहावी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाबाबत पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणविभागाने म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये एटीकेटी सवलत मिळाली आहे त्यांना अकरावी प्रवेशासाठी (इंग्रजी विषयात ATKT असेल तरीही) अर्ज भरता येतील. पण या विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ANh3dX
via nmkadda

0 Response to "Fyjc Admission: अद्याप ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel