Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-09T15:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government job 2021: FSSAI मध्ये विविध पदांची भरती Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने विविध पदांची भरती होणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. FSSAI ने अन्न विश्लेषक (Food Analyst), तांत्रिक अधिकारी(), केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Food Safety Officer), सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager), सहाय्यक व्यवस्थापक IT (Assistant Manager IT), हिंदी अनुवादक (), वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) आणि इतर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहे. १२ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. एफएसएसएआयने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, फूड अॅनालिस्ट आणि टेक्निकल ऑफिसर पदाच्या एकूण १२५ जागा भरल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आयटी, हिंदी ट्रान्सलेटर अनुक्रमे ३७, ४, ४, ३३, १ पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय पर्सनल असिस्टंटची १९ पदे आणि आयटी असिस्टंटची ३ पदे भरती केली जातील. FSSAI Recruitment 2021: असा करा अर्ज हिंदी ट्रान्सलेटर आणि इतर पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. यासाठी सर्वातआधी अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जा. आता वेबसाइटवरील 'जॉब्स' टॅबवर क्लिक करा. एक नवीन पेज खुले होईल. उमेदवार आता जाहिरात क्रमांक- HR-12013/6/2021-HR-FSSAI [DR-04/2021] वर जा. १३ ऑक्टोबरपासून ही लिंक सक्रिय करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना आवश्यक तपशीलांसह अर्ज भरता येईल. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना १५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, ओबीसी उमेदवारांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्युएस या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Asc424
via nmkadda