HCL Recruitment: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये दहावी पास असणाऱ्यांना संधी Rojgar News

HCL Recruitment: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये दहावी पास असणाऱ्यांना संधी Rojgar News

HCL : (HCL) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १० जागा भरल्या जाणार आहेत. फिटर, टर्नर, इलेट्रीशियन, लॅब असिस्टंट (केमिकल) ट्रेडमध्ये ही भरती होणार आहे. यासाठी उमेदवार इयता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. एक वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. या कालावधीपर्यंत उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिला जाईल. अप्रेंटिसशिप संपल्यानंतर त्याचठिकाणी नोकरीची हमी एचसीएलतर्फे देण्यात येत नाही. लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या अर्ज नमुन्यानुसार अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. कार्यालय, सहव्यवस्थापक (एचआर), तळोजा तांबे प्रकल्प, ई -३३-३६, एमआयडीसी, तळोजा, पिनकोड- ४१०२०८ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात भरती महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे (महा कारागृह विभाग) येथे पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील जाहीरातीमध्ये देण्यात आला आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विधी अधिकारी गट ब पदाची जागा भरली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने हे पद भरले जाणार आहे. या पदाचा कालावधी ११ महिन्यांसाठी असेल. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2YejxEY वर दिलेल्या नमुन्यानुसार भरायचा आहे. अर्जावर 'विधी अधिकारी या पदासाठी अर्ज' असा स्पष्ट उल्लेख करायचा आहे.पत्रव्यवहाराकरिता उमेदवाराचा पत्ता लिहिलेले दोन लिफाफे सोबत जोडावे. उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी नमूद करावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A78L0a
via nmkadda

0 Response to "HCL Recruitment: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये दहावी पास असणाऱ्यांना संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel