IBPS Clerk Recruitment 2021: क्लर्क भरतीच्या रिक्त जागांमध्ये बदल; जाणून घ्या अपडेट Rojgar News

IBPS Clerk Recruitment 2021: क्लर्क भरतीच्या रिक्त जागांमध्ये बदल; जाणून घ्या अपडेट Rojgar News

Notification: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन (,IBPS) बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने आयबीपीएस 2021 (IBPS Clerk Recruitment 2021) साठी रिक्त जागांच्या संख्येत सुधारणा केली आहे. रिक्त जागांची संख्या वाढून आता एकूण ७८५८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितात किंवा ज्यांनी यापूर्वीच अर्ज केले आहेत, ते आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन रिक्त जागांची माहिती घेऊ शकतात. ५८ जागा वाढल्या यापूर्वी या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ७८०० जागा भरल्या जाणार होत्या. या संख्येत आता ५८ जागांची भर पडली आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा Clerk Recruitment 2021 च्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २० वर्षे तर कमाल २८ वर्षे असायला हवे. आयबीपीएस क्लर्क भरतीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली आहे आणि २७ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. पूर्व परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल जानेवारी २०२२ मध्ये जाहीर केला जाईल. मुख्य परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी २०२२ मध्ये आयोजित केली जाईल. अंतिम निवड प्रक्रीया एप्रिल २०२२ मध्ये राबवली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ibps official website ला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nlFQ43
via nmkadda

0 Response to "IBPS Clerk Recruitment 2021: क्लर्क भरतीच्या रिक्त जागांमध्ये बदल; जाणून घ्या अपडेट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel