Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-10-21T08:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS RRB PO Main Result 2021: आयबीपीएस आरआरबी पीओ मेन परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
RRB PO Main Result 2021: आयबीपीएस आरआरबी पीओ मेन्स निकाल जाहीर करण्यात आला आहे. IBPS ने निकालाची घोषणा अधिकृत संकेतस्थळ वर केली आहे. मुख्य परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार वेबसाइटवरून आवश्यक माहिती भरून आपला वैयक्तिक निकाल पाहू शकतात. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (Institute of Banking Personnel Selection)उमेदवारांना निकाल पाहण्यासाठी केवळ १९ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर अधिकृत पोर्टलवरून निकालाची लिंक हटवण्यात येईल. म्हणूनच उमेदवारांनी आपले स्कोअर कार्ड लवकरात लवकर डाऊनलोड करून ठेवावे. आरआरबी पीओ मेन्स परीक्षेचे आयोजन २५ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. यानंतर उमेदवार निकालाची प्रतीक्षा करत होते, हा निकाल आता जाहीर झाला आहे. ८ नोव्हेंबरपासून मुलाखतींची शक्यता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, पूर्व आणि मुख्य परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना आता मुलाखतींच्या फेरीत सहभागी व्हायचे आहेत. मुलाखती ८ नोव्हेंबर २०२१ पासून आयोजित केल्या जाऊ शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. IBPS RRB PO Mains Score Card 2021: निकाल पाहण्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा - सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जावे. - वेबसाइटच्या होमपेज वर फ्लॅशिंग लिंक वर क्लिक करा. - आता एक नवी विंडो उघडेल. - यानंतर आयबीपीएस आरआरबी पीओ मेन्स स्कोअर कार्ड २०२१ डाऊनलोड करण्याच्या लिंक वर क्लिक करा. - आता लॉगिन करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड आदि माहिती भरा. - आता निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. - निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट अवश्य घ्या. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nbvAeJ
via nmkadda