IBPS RRB ऑफिसर पदाच्या मुलाखतीसाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

IBPS RRB ऑफिसर पदाच्या मुलाखतीसाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

IBPS Admit Card: आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल I, II आणि III च्या मुलाखतीसाठी प्रवेशप्रत्र जाहीर करण्यात आले आहे. IBPS ने अधिकृत वेबसाइट ibps.in वर मुलाखतीसाठी कॉल लेटर जाहीर केले आहेत. या मुलाखतीला हजर राहणारे उमेदवार नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरुन त्यांचे प्रवेशपत्र (IBPS RRB Officer Interview Admit Card) डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्रामध्ये दिल्याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीवेळी सोबत न्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी सोबत न्यावी लागणार आहे. उमेदवारांना पूर्व आणि मुख्य परीक्षेतील निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबर २०२१ पासुन मुलाखत सुरु होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार पुढील स्टेप्स फॉलो करुन IBPS RRB ऑफिसर मुलाखतीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. स्टेप १: सर्वप्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: ते आता डाउनलोड करा. स्टेप ६: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या. लिपिक पदासाठी रिक्त जागा वाढल्या इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्शनने(Institute of Banking Personnel Selection) ने आयबीपीएस (IBPS Clerk Recruitment 2021) मधील रिक्त पदांची संख्या वाढवली आहे. रिक्त जागा आता ७८५८ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी या भरती मोहिमेद्वारे लिपिक पदांची संख्या ७८०० होती. यामध्ये IBPS ने ५८ पदांची वाढ केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. किमान वयोमर्यादा २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GqgfQa
via nmkadda

0 Response to "IBPS RRB ऑफिसर पदाच्या मुलाखतीसाठी प्रवेशपत्र जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel