Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-26T13:43:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलात ग्रुप सी पदांवर भरती; दहावी उत्तीर्णांसाठी संधी Rojgar News

Advertisement
ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड (ICG) मध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डने ग्रुप सी पदांवरील भरतीसाठी जाहिरात दिली आहे. जाहीरातीनुसार सिविलियन एमटी ड्राइवर (ऑर्डिनरी ग्रेड), फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर/एमटी (मेकेनिकल), फायरमन, इंजिन ड्रायवर, मल्टी टास्किंग स्टाफ आदि एकूण १८ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. २२ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. अर्ज कसा कराल? इंडियन कोस्ट गार्ड ग्रुप सी भरती २०२१ अधिसूचनेनुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट, वर उपलब्ध करण्यात आलेल्या अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतील. इंडियन कोस्ट गार्ड ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी योग्यता सिविलियन एमटी ड्राइवर (ऑर्डिनरी ग्रेड) – दहावी उत्तीर्ण. हेवी आणि लाइट मोटर व्हीकल ड्राइविंग लाइसन्स. मोटर ड्रायविंगचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक. मोटर मेकॅनिझमचे ज्ञान आवश्यक. वयोमर्याद १८ ते २७ वर्षे. फोर्क लिफ्ट ऑपरेटर – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा समकक्ष योग्यता किंवा संबंधित ट्रेडचा तीन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. हेवी मोटर व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स. दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजीचं ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्या दिलं जाईल. वयोमर्याचा १८ ते २७ वर्षे. एमटी फिटर/एमटी (मेकॅनिकल)- दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. ऑटोमोबाइल वर्कशॉपमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. संबंधित ट्रेडमधील आयटीआय डिप्लोमा प्राप्त उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. फायरमन - दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम हवा. उंची किमान १६५ सें.मी. छाती किमान ८१.५ से.मी. आणि फुगवून ८५ से.मी. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. इंजिन ड्रायव्हर – सरकारी मान्यता कोणत्याही संस्थेतून इंजिन ड्रायव्हर म्हणून कॉम्पीटन्सी सर्टिफिकेट. दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. मल्टी टास्किंग स्टाफ (चौकीदार) - दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत चौकीदारीचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे. लस्कर - दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष योग्यता. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bl66Ax
via nmkadda