IGNOU जून टीईई परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर Rojgar News

IGNOU जून टीईई परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर Rojgar News

June TEE Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University,IGNOU) जून २०२१ च्या टर्म एंड परीक्षेचे निकाल (June 2021 Term End Exam Results) जाहीर केले आहेत. यासोबतच इग्नूने जून २०२१ च्या टीईई पुनर्मूल्यांकन परीक्षेचा निकालही (Result of TEE Re-evaluation Examination of June 2021) जाहीर केला आहे. इग्नूने आयोजित केलेल्या विविध यूजी, पीजी, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे जून २०२१ च्या टर्म एंड परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल पाहू शकतात. जून टीईई २०२१ चा निकाल इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर सक्रिय केलेल्या लिंकद्वारे पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना निकालाच्या पेजवर त्यांचा नोंदणी क्रमांक भरावा लागेल. बातमीखाली निकालाची थेट लिंक देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे निकाल रद्द काही विद्यार्थ्यांचे निकाल इग्नूने जाहीर केले नाहीत. परीक्षेवेळी गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करताना आढळला तर त्याचा निकाल रद्द करण्यात येतो. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) ने जून २०२१ सत्रासाठी नॉन-सेमिस्टर आधारित ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. ज्या उमेदवारांना इग्नूमधून ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणासाठी नावनोंदणी करायची आहे ते इग्नूच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. डिसेंबर २०२१ च्या टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे डिसेंबर टीईई २०२१ परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये टर्म-एंड परीक्षेला बसलेले उमेदवार इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन पूर्ण वेळापत्रक तपासू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल. डिसेंबर २०२१ च्या टर्म एंड परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी पोर्टल योग्य वेळी उघडले जाणार आहे. महत्वाच्या तारखा डिसेंबर TEE साठी परीक्षेची सुरुवात - २० जानेवारी २०२२(तात्पुरती) डिसेंबर TEE परीक्षेची अंतिम तारीख - २२ फेब्रुवारी २०२२ (तात्पुरती) तक्रार दाखल करण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nECQA2
via nmkadda

0 Response to "IGNOU जून टीईई परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel