IIM Indore Placements: २ महिने इंटर्नशीप; चार लाखांपर्यंत स्टायपेंड! Rojgar News

IIM Indore Placements: २ महिने इंटर्नशीप; चार लाखांपर्यंत स्टायपेंड! Rojgar News

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आयआयएम इंदूरने (IIM Indore)आपल्या उन्हाळी इंटर्नशिप प्लेसमेंट प्रोग्रामची प्रक्रिया पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशीपच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्टायपेंडची सरासरी सर्वाधिक ऑफर ४ लाख रुपये आहे. समर इंटर्नशिप प्लेसमेंटसाठी आयआयएमच्या दोन प्रमुख अभ्यासक्रमांच्या एकूण ५७३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. व्यवस्थापन किंवा एमबीए मधील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि ५ वर्षांचा एकात्मिक एमबीए कार्यक्रम (बीबीए+एमबीए) या दोन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी या समर इंटर्नशीपमध्ये सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये भारतातील काही प्रमुख कंपन्या होत्या. विद्यार्थ्यांना गुगल, अॅमेझॉन, अमेरिकन एक्सप्रेस, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, बार्कलेज, सिप्ला आणि टीसीएस या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यात आली. विविध कंपन्यांसाठी ऑफर केलेले वास्तविक वेतन भिन्न आहे. कोणत्या कंपनीने सर्वाधिक स्टायपेंड दिला याचे तपशील शेअर केले गेले नाहीत. दरवर्षी विविध आयआयएममधील विद्यार्थ्यांना टॉप कंपन्यांकडून प्लेसमेंटची संधी दिली जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर समर प्लेसमेंट आधी मिळणारी ही इंटर्नशीप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असते. ज्या विद्यार्थ्यांना विविध आयआयएममध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, किंवा जे विद्यार्थी आता आयआयएममध्ये शिकत आहेत, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आयआयएम प्रवेशांसाठी कॅट २०२१ चे आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत अॅडमिट कार्ड मिळणार आहेत. आयआयएम इंदूरच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांना प्रवेश कॅट च्या माध्यमातून मिळतात. पाच इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी आयआयएम इंदुर स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lIMOAV
via nmkadda

0 Response to "IIM Indore Placements: २ महिने इंटर्नशीप; चार लाखांपर्यंत स्टायपेंड! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel