TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IIT JAM 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

IIT JAM 2022: जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स अर्थात परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. देशभरात २० भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये MSc पदवी आणि इतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणि भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू येथे एकात्मिक पीएचडी अभ्यासक्रमाच्या २०२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. यंदा परीक्षेचे आयोजन आयआयटी रुरकी करणार आहे. आयआयटी रुरकीने या परीक्षा पोर्टलवर जारी केलेल्या अपडेटनुसार, इच्छुक उमेदवार आता १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करू शकतील. IIT JAM २०२२ साठी अर्ज करण्याची मुदत ११ ऑक्टोबर २०२१ रोजी संपत होती. पात्रतेमध्ये शिथिलतेची घोषणा आयआयटी रूरकीने 2022 परीक्षेत बसण्यासाठी निर्धारित केलेल्या पात्रता निकषांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. ही सवलत एकदाच लागू असेल. परीक्षा पोर्टलवर संस्थेने जारी केलेल्या अपडेटनुसार, प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांना यंदा प्रवेश परीक्षेसाठी किमान पात्रता गुणांची अट पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी पात्रता परीक्षेत किमान ५५% गुण असणे अनिवार्य होते. पुढील पद्धतीने करा अर्ज परीक्षा पोर्टल, jam.iisc.ac.in ला भेट दिल्यानंतर, उमेदवारांना आयआयटी जेएएम 2022 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर 'New user/Register here'या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा आणि नंतर विचारलेले तपशील भरा. त्यानंतर, उमेदवार त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून आणि आवश्यक तपशील भरून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. परीक्षा १३ फेब्रुवारीला आयआयटी जॅम २०२२ परीक्षेसाठी आयआयटी रुरकीद्वारे जारी वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अॅडमिट कार्ड ४ जानेवारी २०२२ रोजी जारी केले जातील. परीक्षेच्या निकालाची घोषणा २२ मार्च २०२२ रोजी केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AtbcdH
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या