IITs, NITs आणि इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी JoSAA समुपदेशन वेळापत्रक जाहीर Rojgar News

IITs, NITs आणि इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी JoSAA समुपदेशन वेळापत्रक जाहीर Rojgar News

JEE Advanced 2021: जॉइंट सीट अॅलोकेशन अथॉरिटी (JoSAA) ने देशातील IITs, NITs, ट्रिपल IT, IIEST यासह सर्व केंद्रीय सहाय्यित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी काऊन्सेलिंग वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट .nic.in वर संपूर्ण वेळापत्रक पाहता येणार आहे. यानुसार पहिल्या फेरीसाठी नोंदणी आणि पर्याय निवडण्यासाठी १६ ऑक्टोबर सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होईल आणि ही प्रक्रिया २१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. याशिवाय २२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता पहिली मॉक सीट वाटप यादी जाहीर केली जाईल. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या भरलेल्या निवडीच्या आधारावर जागा वाटप केल्या जातील. JoSAA काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण पत्ता, लिंग, राज्य कोड आणि राष्ट्रीयता हा तपशील भरुन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना JoSAA काऊन्सेलिंग अंतर्गत जागा वाटप करण्यात आल्या आहेत त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि निर्धारित तारखेच्या आत सीट स्वीकृती शुल्क भरून जागा स्वीकाराव्या लागतील. ज्या विद्यार्थ्यांना आपली जागा मागे घ्यायची आहे ते जागा वाटपाच्या अंतिम फेरीपूर्वी दुसऱ्या फेरीपासून आणि जागा वाटपाच्या पाचव्या फेरीपर्यंत असे करू शकतात. यानंतर विद्यार्थ्यांना वेळ दिला जाणार नाही. JEE Advanced साठी काऊन्सेलिंग प्रक्रिया सहा फेऱ्यांमध्ये घेतली जाईल. तर प्रत्येक यादी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणी प्रक्रिया, सीट स्वीकृती आणि सीट स्वीकृती शुल्क यांचे पालन करेल. काऊन्सेलिंगची शेवटची फेरी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याशिवाय, काऊन्सेलिंगशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. परीक्षेचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर जाहीर केला जाईल. जेईईई Advanced 2021 परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी JOSSA काऊन्सेलिंगद्वारे भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (IIT) प्रवेश घेतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BEtYA7
via nmkadda

0 Response to "IITs, NITs आणि इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी JoSAA समुपदेशन वेळापत्रक जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel