Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-05T12:43:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Indian Navy Recruitment 2021: बीटेक कॅडेट एंट्री स्कीम कोर्ससाठी 'असा' करा अर्ज Rojgar News

Advertisement
Indian Navy Recruitment 2021: इंडियन नेव्ही (Indian Navy) ने १० + २ (बीटेक) कॅडेट एंट्री स्कीम कोर्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ अक्टोबरपासून सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे. या प्रवेशाअंतर्गत एकूण ३५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एज्युकेशन ब्रांचसाठी ५ जागा आणि एक्झिक्युटीव्ह अॅण्ड टेक्निकल ब्रांचसाठी ३० जागा आहेत. हे उमेदवार करु शकतात अर्ज जेईई (बीई/बीटेक) परीक्षा २०२१ मध्ये सहभागी झालेले आणि ऑल इंडिया रँक जाहीर झालाय ते या कोर्ससाठी अर्ज करण्यास पात्र असतील. उमेदवारांना सिनिअर सेकेंडरी एक्झाम म्हणजेच बारावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये किमान ७० टक्के आणि इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के असणे गरजेचे आहे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००२ आणि १ जानेवारी २००५ दरम्यान होणे गरजेचे आहे. पात्रता निकषाची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. बातमीखाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर जाऊन नोटिफिकेशन पाहता येणार आहे. निवड प्रक्रिया जेईई मुख्य परीक्षा २०२१ मध्ये ऑल इंडीया रॅंकच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेद्वारे निवड केली जाईल. नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या चरणांसह अर्ज करा या स्टेप्स फॉलो करुन भरा अर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जा. होमपेजवर दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पेज खुले होईल. येथे तुम्हाला दोन नोंदणी पर्याय दिसतील. पहिला आधार आयडी द्वारे आणि नोंदणीचा दुसरा पर्याय आधार आयडीशिवाय असेल. उमेदवार कोणत्याही एका पर्यायाच्या लिंकवर क्लिक करु शकतात. यानंतर मागितलेली माहिती भरुन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. आता मागील पेजवर या. तुमच्या ई -मेल आयडी आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DbquFD
via nmkadda