Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-04T08:43:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Advanced 2021 परीक्षेची रिस्पॉन्स शीट, उत्तरतालिका आणि रिझल्टची तारीख जाणून घ्या Rojgar News

Advertisement
2021: देशभरातील प्रतिष्ठित आयआयटीतील विविध यूजी कोर्सेसमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा रविवारी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आली. परीक्षा तीन तासांच्या दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आली. सकाळी नऊ वाजता आणि दुपारी दोन वाजता परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रामध्ये घेण्यात आलेली पेपर १ ची परीक्षा उमेदवारांना कठीण वाटली. विशेषतः गणिताचे सेक्शन विद्यार्थ्यांना कठीण गेले. तर दुपारच्या सत्रातील पेपर २ हा पेपर १ च्या तुलनेत सोपा गेल्याचे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी सांगितले. महत्वाच्या तारखा जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेच्या आयोजनानंतर त्याच्या निकालाची घोषणा आयआयटी खरगपूरद्वारे केली जाणार आहे. या अंतर्गत संस्थेद्वारे सर्वात आधी दोन्ही पेपर दिलेल्या उमेदवारांची रिस्पॉन्स शीट ५ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजल्यापासून डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारा जेईई अॅडव्हान्स २०२१ रिप्सॉन्स शीटची कॉपी परीक्षा पोर्टल jeeadv.ac.in वर लॉगिन करुन डाऊनलोड करु शकतील. यानंतर संस्थेद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची अधिकृत पण तात्पुरती उत्तरतालिका रविवारी १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता जाहीर केली जाणार आहे. यासोबतच प्रोव्हिजनल उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ दिला जाईल. ११ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. आक्षेपांची समिक्षा केल्यानंतर आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची अंतिम उत्तरतालिका १५ ऑक्टोबर २०२१ ला जाहीर केली जाणार आहे. यासोबतच संस्थेद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ च्या रिझल्टची घोषणा १५ ऑक्टोबरला केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YcjrgP
via nmkadda