JEE Advanced 2021 परीक्षेचा निकाल 'असा' करा डाऊनलोड Rojgar News

JEE Advanced 2021 परीक्षेचा निकाल 'असा' करा डाऊनलोड Rojgar News

2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खडगपूरतर्फे जेईई अॅडव्हान्स रिझल्ट २०२१ ( Result)ची घोषणा १५ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. जेईई अॅडव्हान्स रिझल्ट २०२१ अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाहीर केला जाणार आहे. वैयक्तिकरित्या आणि एकूण तीन विषयांमध्ये किमान पात्रता गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स २०२१ रॅंक यादीमध्ये स्थान मिळणार आहे. गुरुवारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अॅडव्हान्स २०२१ (JEE Advanced 2021) ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबरला करण्यात आले होते. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका डाऊनलोड करु शकतात. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० सप्टेंबर २०२१ पर्यंत वेळ मिळाला. त्याच वेळी, अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२१ होती. परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार अंतिम उत्तरतालिका आणि निकालाची वाट पाहत आहेत. निकालांच्या आधारे, जागा वाटप प्रक्रिया १६ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार आहे. मागील वर्षाप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. Result 2021: असा तपासा स्टेप्स १: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा. स्टेप्स २: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप्स ३: आता तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख सबमिट करा. स्टेप्स ४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप्स ५: आता निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट काढा. जेईई अॅडव्हान्स २०२१: महत्वाच्या तारखा JEE Advanced 2021 ची उत्तरतालिका आणि ऑनलाईन घोषणा - १५ ऑक्टोबर २०२१ आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी ऑनलाइन नोंदणी - १५ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२१ आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) - १८ ऑक्टोबर २०२१ AAT निकालांची घोषणा - २२ ऑक्टोबर २०२१ सीट वाटप प्रक्रियेची संभाव्य सुरुवात - १६ ऑक्टोबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iLIPBA
via nmkadda

0 Response to "JEE Advanced 2021 परीक्षेचा निकाल 'असा' करा डाऊनलोड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel