JEE Advanced AAT 2021: कधी होणार जाहीर? जाणून घ्या... Rojgar News

JEE Advanced AAT 2021: कधी होणार जाहीर? जाणून घ्या... Rojgar News

2021: आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (Architecture Aptitude Test Result 2021) रिझल्ट शुक्रवारी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, खडगपूर (Indian Institute of Technology, Kharagpur) एएटी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जारी केला जाईल. संस्थेने निकाल वेळेत जाहीर होण्यासंबंधी कोणतीही घोषणा केलेली नाही, मात्र अधिकृत वेबसाइटवर १९ ऑक्टोबर रोजी जारी अधिसूचनेत असं म्हटलं आहे की, 'एएटी परीक्षा संपली आहे आणि एएटी निकाल २२ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार एएटी निकालाच्या घोषणेनंतर एएटी पर्याय भरू शकतात. लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.' ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात. निकाल जाहीर होताच, उमेदवार पोर्टल वर जरूरी माहिती भरून आपला स्कोर तपासू शकतील. परीक्षार्थी पुढील सोप्या स्टेप्सद्वारे निकाल पाहू शकतील. JEE Advanced 2021: आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट निकाल कसा तपासावा? - उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट-jeeadv.ac.in वर जा. - आता AAT Result 2021 या लिंकवर क्लिक करा. - आता एक नवी विंडो उघडेल. - उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक आदी माहिती देऊन लॉग इन करावे. - यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल. - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घेऊन ठेवा. B. Arch. कोर्स IIT (BHU) बनारस, IIT खडगपूर आणि IIT रुडकी मध्ये शिकवला जातो. ही परीक्षा १८ ऑक्टोबर २०२१ रोजी ऑफलाइन मोडमध्ये आयोजित करण्यात आली होती. अधिक माहितीसाठी उमेदवार IIT JEE ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vx2z0Y
via nmkadda

0 Response to "JEE Advanced AAT 2021: कधी होणार जाहीर? जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel