Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T06:44:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JoSAA Counselling 2021: पहिल्या फेरीची जागा वाटप यादी जाहीर Rojgar News

Advertisement
JoSAA Counseling 2021: जॉइंट सीट अलोकेशन अथोरिटी (Joint Seat Allocation Authority, JoSAA)तर्फे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्या फेरीची जागा वाटप यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील IITs, NITs, Triple IT, IIEST सह सर्व केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी पहिल्या फेरीची सीट वाटप यादी अपलोड करण्यात आली आहे. या संस्थांमधील प्रवेशासाठी निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आवश्यक तपशील भरुन यादी पाहू शकतात. उमेदवारांना JoSAA ची अधिकृत वेबसाइट Josaa.nic.in वर ही यादी पाहता येणार आहे. काऊन्सेलिंग वेळापत्रकानुसार, निवडलेले उमेदवार ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी ऑनलाइन रिपोर्ट देऊ शकतात. या कालावधीत विद्यार्थ्यांना काऊन्सेलिंक शुल्क भरावे लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर १ नोव्हेंबरला दुसऱ्या फेरीची जागा वाटप यादी प्रसिद्ध होईल. यापूर्वी JoSAA ने दोन मॉक अलॉटमेंट यादी प्रसिद्ध केली होती. उमेदवारांनी शेवटच्या लॉक केलेल्या निवडींचा प्रिंटआउट घ्यावा, कारण अहवाल देताना हा दस्तऐवज आवश्यक असणार आहे. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांना त्यांची जागा परत घ्यायची आहे ते दुसऱ्या फेरीपासून पाचव्या फेरीपर्यंत ही प्रक्रिया करू शकतात. JoSAA समुपदेशन प्रक्रिया संपल्यानंतर सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड (Central Seat Allocation Board, CSAB) NIT+ प्रणाली अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी दोन काऊन्सेलिंग फेऱ्या आयोजित करेल. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट csab.nic.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. JoSAA Counselling 2021: या स्टेप्स फॉलो करुन तपासा यादी उमेदवारांनी सर्वप्रथम काऊन्सेलिंगची अधिकृत वेबसाइट josaa.nic.in वर जा. होमपेजवर 'फेरी 1 जागा वाटप निकाल' असलेल्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी उमेदवारांनी त्यांचे क्रेडेन्शियल्स एंटर करा. त्यानंतर जागा वाटपाच्या पहिल्या फेरीसाठी तुमचा JoSAA काऊन्सेलिंग २०२१ चा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंट घ्या. जेईई अॅडव्हान्स पात्र उमेदवार सर्व संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. पण जेईई मेन पात्र उमेदवार आयआयटी व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात या काऊन्सेलिंग प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZwYxKo
via nmkadda