LIC तर्फे २१३ पदांची भरती; प्रवेशपत्र 'या' लिंकवरुन करा डाऊनलोड Rojgar News

LIC तर्फे २१३ पदांची भरती; प्रवेशपत्र 'या' लिंकवरुन करा डाऊनलोड Rojgar News

2021: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) दोन भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. ही भरती सहाय्यक अभियंता (LIC Assistant Engineer)आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (LIC AAO)पदांसाठी केली जात आहे. असिस्टंट इंजिनीअरच्या ५० आणि एएओच्या १६८ पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. दोन्ही परीक्षांच्या प्रवेशपत्राची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. LIC AAO आणि AE परीक्षांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट licinidia.in वर जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना ३१ ऑक्टोबरपर्यंत डाऊनलोड करता येणार आहे. एलआयसी एएओ आणि एई मेन्सची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. AAO and AE : असे करा डाऊनलोड एलआयसी वेबसाइटवर जा. होमपेजवरील LIC करिअर विभागात जा. करिअर पेजवर असिस्टंट इंजिनीअर रिक्रुटमेंट आणि AAO (स्पेशलिस्ट) भरती २०२० च्या लिंकवर क्लिक करा. नवीन पेजवर जाऊन कॉल लेटर डाउनलोड लिंक वर क्लिक करा. Ibpsonline ची लिंक उघडेल. येथे दिलेल्या जागेत तुमचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि ऑन-स्क्रीन सिक्योरिटी कोड टाकून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र दिसेल. ते डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या. देशभरातील करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागल्यानंतर उमेदवारांना पुर्व परीक्षेसाठी प्रतिक्षा करावी लागली होती. ही परीक्षा २८ ऑगस्ट रोजी झाली. त्याचे प्रवेशपत्र १४ ऑगस्ट रोजी जाहीर झाले. पूर्व परीक्षेचा निकाल २९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येते. मुख्य परीक्षेत शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते. मुख्य परीक्षेमध्ये (LIC AE & AAO Main Exam)३०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह टेस्ट आणि २५ गुणांचे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा समावेश असेल. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होतील. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या प्रत्येक विभागसाठी वेगळा वेळ असेल. उमेदवारांना कॉम्प्यूटरवर टाइप करुन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आयोजित केली जाईल. अधिकृत नोटिफिकेशननुसार मुख्य परीक्षा केंद्रामध्ये (LIC AE & AAO Main Exam Centre) बदलावर आक्षेपावर आता विचार केला जाणार नाही. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी बायोमेट्रीक थंब इंप्रेशन डेटा कॅप्चरच्या ऐवजी आयरीस कॅप्चरचा उपयोग केला जाणार आहे. एलआयसीतर्फे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचा फोटो आणि IRIS कॅप्चर आणि पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jm4tN9
via nmkadda

0 Response to "LIC तर्फे २१३ पदांची भरती; प्रवेशपत्र 'या' लिंकवरुन करा डाऊनलोड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel