Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-19T06:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

LSAT India 2022: लॉ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात Rojgar News

Advertisement
India 2022: लॉ क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी आणि कोर्सेसच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लॉ स्कूल प्रवेश परीक्षा म्हणजेच LSAT India २०२२ ही देशभरातील विविध खासगी विद्यापीठ आणि कॉलेजमधील लॉ कोर्सेससाठी शैक्षणिक २०२२-२३ मधील प्रवेशासाठी आयोजित करण्यात येते. LSAT इंडिया २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. LSAT India २०२२ द्वारे देशातील खासगी संस्थांमध्ये लॉ अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया मधील २०० पेक्षा जास्त शाळांच्या लॉ स्कूल प्रवेश परिषदेच्या () इंडिया विंग द्वारे प्रवेश घेऊ शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट discoverlaw.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. LSAC ऑनलाइन पद्धतीने दोनदा परीक्षा घेणार लॉ स्कूल अॅडमिशन काऊन्सिलने लॉ स्कूल अॅडमिशन टेस्ट २०२२ यावेळी ऑनलाईन प्रोक्टर्ड मोडमध्ये घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे, परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार करोनाच्या पार्श्वभूमीवर घरी ऑनलाईन पद्धतीने परीक्षेला बसू शकतील. यासह, परिषदेने यावेळी दोन फेऱ्यांमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आहे. अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेल्या अपडेटनुसार, एलएसएटी इंडिया २०२२ ही १५ जानेवारी २०२२ आणि नंतर ९ मे २०२२ पासून आयोजित केली जाईल. ही परीक्षा ५ दिवस चालेल. लॉ स्कूल प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारावर, देशातील ८५ हून अधिक लॉ शैक्षणिक संस्थांमध्ये ३ वर्षांच्या एलएलबी, ५ वर्षांच्या एलएलबी पीजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिले जातात. परीक्षेचा कालावधी २ तास २० मिनिटे असेल. यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही विषयात बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर पीजी अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30Gq10n
via nmkadda