MAH MBA/MMS सीईटीचा निकाल कधी? जाणून घ्या... Rojgar News

MAH MBA/MMS सीईटीचा निकाल कधी? जाणून घ्या... Rojgar News

MHT CET 2021 च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ताज्या अपडेट्सनुसार, MAH MBA/MMS result बुधवारी २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल पाहता येईल. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (Maharashtra Common Entrance Test Cell, CET Cell) अद्याप MHT CET 2021 निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र अधिकृत नोटिफिकेशननुसार, इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात २८ ऑक्टोबर पर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. शिवाय MAH MBA/MMS सीईटीचा निकाल बुधवारी २० ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. mahacet.org या अधिकृत पोर्टलवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. MHT CET 2021 Result ची तारीख तात्पुरती आहे. ही परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेने सांगितले की, निकालाची घोषणा २८ ऑक्टोबर दिवशी किंवा त्यापूर्वी होईल. विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल विविध दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. सीईटी सेलकडून आतापर्यंत केवळ तीन 'सीईटीं'चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन या तीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण; तसेच व्यवस्थापन, बीपीएड, एलएलबी, हॉटेल मॅनेजमेंटचा पदवी अभ्यासक्रम अशा विषयांसाठीच्या सीईटीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z0RGc4
via nmkadda

0 Response to "MAH MBA/MMS सीईटीचा निकाल कधी? जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel