TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MAHATET Exam 2021: शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा लांबणीवर Rojgar News

Maharashtra 2021: महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती (Teacher jobs) साठी होणाऱ्या देणाऱ्या ( 2021) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षक पात्रता परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट काऊन्सिल ऑफ एक्झामिनेशनने यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याआधीच्या वेळापत्रकानुसार राज्यात ३० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण त्या दिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. यामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ३० ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी १४ ऑक्टोबर रोजी प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले होते. अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते. पण आता परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे अपडेट प्रवेशपत्र उमेदवारांना लवकरच देण्यात येईल. MAHATET Admit Card: असे करा डाऊनलोड उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे. नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे. आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे. यानंतर उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह करावी. महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षा होणार आहेत. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता शिक्षणविभागाकडून वर्तविली जात आहे. टीईटी अनिवार्य इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी(TET) अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत आणि कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b5eCcc
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या