Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-18T13:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MH SET 2021: सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका जारी Rojgar News

Advertisement
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत स्टेट एलिजिबिलीटी टेस्ट अर्थात SET परीक्षेची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. उत्तरतालिका सेट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उत्तरतालिकेतील उत्तरांवर हरकत घेण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे. २६ सप्टेंबरला पुणे विद्यापीठामार्फत ३७ वी सेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १५ शहरांतील २२० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पेपर व पेन अशा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका आज ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे. याबाबत काही सूचना, तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या नोंदविता येणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील https://ift.tt/ILElaz या लिंकवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून, आवश्यक पुरावा व शुल्कासह या सूचना, तक्रारी दाखल करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या सेट विभागाकडून करण्यात आले आहे. उत्तरतालिकेबाबतची लिंक वेबसाइटवर १८ ते २८ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असून, या कालावधीतच सूचना व तक्रारी नोंदविता येणार आहेत. विद्यार्थ्यांना या उत्तरतालिकेवर केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सूचना किंवा तक्रारी दाखल करता येणार असून, व्यक्तिश: किंवा टपालामार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे. उत्तरतालिकेबाबत २८ ऑक्टोबरनंतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ‘यूजीसी’च्या मान्यतेनंतर लवकरच अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra SET 2021 परीक्षेची आन्सर की कशा पद्धतीने पाहाल? - सर्वात आधी MH SET चे अधिकृत पोर्टल setexam.unipune.ac.in ne वर जा. - होमपेजवर Maharashtra SET 2021 provisional answer key ची यादीची लिंक शोधा आणि क्लिक करा. - आता A,B,C,D या सेट नंबर्सपैकी तुमचा सेट नंबर निवडा आणि उघडा. - यानंतर MH-SET आन्सर की वरील उत्तरे आणि रिस्पॉन्स शीट वरील उत्तरे पडताळून पाहा. - यानंतर Maharashtra SET 2021 आन्सर की ची कॉपी सेव्ह करा. Maharashtra SET 2021 मार्किंग स्कीमनुसार प्रत्येक योग्य उत्तराला दोन गुण मिळणार आहेत. नकारात्मक मूल्यांकनाविषयी कोणतेही नोटिफिकेशन विद्यापीठाने जारी केलेले नाही. सेटच्या संकेतस्थळावरूनच उमेदवारांना Maharashtra SET 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवायच्या आहेत. प्रति हरकत शुल्क एक हजार रुपये आहे. उमेदवारांनी हरकतीत मांडलेले उत्तर योग्य आल्यास शुल्क परतावा दिला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BUlJAj
via nmkadda