Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T11:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MHT CET Result 2021: एमएचटी-सीईटीचा निकाल आज सायंकाळी Rojgar News

Advertisement
MHT Result 2021: राज्यातील सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात MHT CET 2021 चा निकाल बुधवारी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही सीईटी आयोजित करण्यात येते. २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ही सीईटी घेण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ वर पाहू शकतात. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे ही परीक्षा घेण्यात येते. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स) आणि पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) अशा दोन गटात ही परीक्षा होते. यापूर्वी सीईटी कक्षाने ११ ऑक्टोबर रोजी एमएचटी सीईटीची उत्तरतालिका जाहीर केली होती. विद्यार्थ्यांना १२ आणि १३ ऑक्टोबर असे दोन दिवस हरकतींसाठी देण्यात आले होते. अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे अंतिम निकाल जाहीर केला जाईल. यंदा सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होती. मागील वर्षी २०२० मध्ये ५,४२,४३१ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. एमएचटी सीईटीच्या निकालानंतर पात्र विद्यार्थ्यांची प्रवेशांसाठी कॉमन अॅडमिशन प्रोसेस होईल. CAP चं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयांचे पसंतीक्रम या फेरीत भरायचे असून त्यांच्या सीईटी गुणांनुसार प्रवेश अलॉट होतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BhKW6v
via nmkadda