Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-28T06:43:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MHT CET Toppers 2021: हे आहेत एमएचटी सीईटीचे टॉपर्स, शहरानुसार यादी पाहा Rojgar News

Advertisement
MHT CET : इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनाअधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. या निकालामध्ये २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पीसीबी ग्रुपमधील टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पीसीएम गटात मुंबईतील विंच्ची दिशी, हर्ष शहा, अर्श मकनोजिया, नीरजा पाटील, राकेश कृष्णा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ठाण्यातील जनम खंडेलवाल या विद्यार्थ्याचा समावेश आहे. औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेश घेण्यासाठी ‘पीसीबी’ गटातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीसीबी गटात मुंबईतील राजवील लखानी, कल्याणी कुडाळकर, कृष्णप्रिया नम्बोथिरी, तर ठाण्यातील मयुरा निकिता, गायत्री नायर या विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. परीक्षा २०२१ ही २० सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर, अतिवृष्टीमुळे परीक्षेला बसू न शकलेल्या उमेदवारांसाठी ९ आणि १० ऑक्टोबर रोजी एक विशेष परीक्षा देखील घेण्यात आली होती. यंदा या परीक्षेत तब्बल २८ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेत PCB साठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २,२२,९३२ इतकी आहे आणि PCM साठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,९२,०३६ आहे. परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या८९८६७ इतकी आहे. PCB आणि PMB या दोन्ही अभ्यासक्रमांच्या टॉपर्सची यादी येथे देण्यात आली आहे. टॉपर्स २०२१- पीसीएम कोर्स तपन अविनाश चिकणीस- कोल्हापूर वेदांत विकास चांदेवार- नागपूर विंची दिपेश डिशी- मुंबई उपनगर हर्ष अजुभाई शाह- मुंबई शहर अर्ष मनकोजिया- मुंबई उपनगर सचिन गणेश सुगदरे- सातारा स्नेहा रावसाहेब पजाई- अमरावती नीरजा विश्वनाथ पाटील- मुंबई उपनगर आदित्य नर्बडेश्वर मेहता- पुणे जनम रमेशभाई खंडेलवाल- ठाणे क्रिशा राकेश शा- मुंबई उपनगर एमएचटी सीईटी टॉपर्स २०२१- पीसीबी कोर्स आयमन फातेमा मोहम्मद अमजदुल्ला- नांदेड अनिरुद्ध अरुणराव आईनवाले - नांदेड राजवीर लखानी- मुंबई उपनगर कल्याणी कुडाळकर- मुंबई उपनगर प्राजक्ता दत्ताराय कदम- पुणे आशानी जोशी- नागपूर मोहित जितेंद्र पाटील - नाशिक सर्वेश अजय झोपे - जळगाव आदर्श विष्णू थोरात - सांगली कृष्णप्रिया आर नंबूथिरी- मुंबई शहर शुभम सदाशिव बनेके - पुणे जेनिका रामकिशन काळे - लातूर निकिता फुलचंद मौर्य - ठाणे गायत्री सेतुमाधवन नायर - ठाणे ज्ञानेश्वरी संतोषकुमार राऊत - पुणे तन्वी संतोष गहुकर- अकोला इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या अभ्यासक्रमांसाठी राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येते. ही प्रवेश परीक्षा यंदा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी २२७ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने १३ दिवसांत २६ सत्रांमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) हे विषय घेऊन सुमारे १ लाख ९२ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) हा गट घेऊन दोन लाख २२ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी पीसीएम गटातील ११ विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी गटातील १७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. हा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Co0oiS
via nmkadda