Navy MR Recruitment: नौदलात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी Rojgar News

Navy MR Recruitment: नौदलात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी Rojgar News

Navy MR Recruitment: दहावी पास असणाऱ्यांसाठी नौदलात सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय नौदलाने एप्रिल २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या बॅचसाठी नाविक म्हणून मॅट्रिक भरती (MR) साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नेव्ही एमआर एप्रिल २०२२ जाहिरातीनुसार ३०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी निवड प्रक्रियेचा भाग म्हणून साधारण १५०० उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी बोलावले जाईल. तसेच लेखी परीक्षेला बसण्यासाठी कट-ऑफ निर्धारित केली जाऊ शकते. ही कट ऑफ प्रत्येक राज्यात वेगळी असू शकते. Navy MR Recruitment: अर्ज प्रक्रिया भारतीय नौदलात मॅट्रिक भरती २०२१-२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नौदल भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवार २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून नेव्ही एमआर भर्ती २०२१ नोटिफिकेशन डाउनलोड करावे आणि काळजीपूर्वक वाचावे. नेव्ही एमआर भरती २०२१ साठी पात्रता भारतीय नौदलाने एप्रिल २०२२ बॅचसाठी जाहीर केलेल्या एमआर नोटिफिकेशन २०२१ नुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक अर्थात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांचा जन्म १ एप्रिल २००२ पूर्वीचा नसावा आणि ३१ मार्च २००५ नंतरचा असावा. MR च्या एकूण ३०० रिक्त पदांसाठी अर्जाच्या आधारे १५०० उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. परीक्षेमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी ३० मिनिटांचा असेल. हे प्रश्न गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयातून विचारले जातील. प्रश्नांची पातळी दहावीची असेल. उमेदवार नौसेना भर्ती पोर्टलवरून अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aD2KxW
via nmkadda

0 Response to "Navy MR Recruitment: नौदलात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel