NCLT मध्ये लॉ पदवीधरांची भरती; एका मुलाखतीतून मिळणार सरकारी नोकरी Rojgar News

NCLT मध्ये लॉ पदवीधरांची भरती; एका मुलाखतीतून मिळणार सरकारी नोकरी Rojgar News

Law Research Associate Recruitment 2021: लॉ चे शिक्षण पूर्ण केलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने लॉ ग्रॅज्युएट्ससाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही भरती एलएलबी करणार्‍या फ्रेशर्स उमेदवारांसाठी आणि अनुभवी तरुणांसाठी केली जाणार आहे. NCLT ने अधिकृत वेबसाइट nclt.gov.in यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार फक्त मुलाखत देऊन ही मिळवू शकतात. एनसीएलटी रिक्त पदाचे नोटिफिकेशन आणि अर्जाची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. पदाचे नाव – लॉ रिसर्च असोसिएट पदांची संख्या – २७ पगार – ४० हजार रुपये प्रति महिना या भरती प्रक्रियेद्वारे देशातील ८ वेगवेगळ्या शहरांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. कोणत्या शहरात किती पदांची भरती होणार याचा तपशील जाणून घ्या. शहर आणि रिक्त पदांचा तपशील नवी दिल्ली – ०३ पदे मुंबई – ०८ जागा कोलकाता – ०३ पदे हैदराबाद – ०४ पदे अलाहाबाद – ०२ जागा गुवाहाटी – ०१ पोस्ट कटक – ०३ पदे अमरावती – ०३ पदे पात्रता उमेदवाराकडे देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कायद्याची पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराने नुकतीच एलएलबीच्या अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली असावी. याव्यतिरिक्त एलएलबी पदवीसोबतच या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराची बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा या सरकारी नोकरीसाठी उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराच्या जन्मतारखेपासून ०१ नोव्हेंबर २०२२१ पर्यंत वयाची गणना केली जाईल. NCLT application process: असा करा अर्ज NCLT भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज भरुन ncltheadquartwes@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशनच्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करा. त्याची प्रिंट काढा. संपूर्ण माहिती अचूक भरा. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रतींसोबत, त्याची स्कॅन केलेली प्रत ईमेलमध्ये जोडून पाठवा. तुमची सर्व कागदपत्रे एकाच पीडीएफ फाईलमध्ये असावीत. उमेदवार फक्त एकाच जागेसाठी अर्ज करू शकतो. ०१ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. निवड प्रक्रिया या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. मुलाखत नवी दिल्लीत होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BgxO1i
via nmkadda

0 Response to "NCLT मध्ये लॉ पदवीधरांची भरती; एका मुलाखतीतून मिळणार सरकारी नोकरी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel