Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-22T14:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET PG काऊन्सेलिंगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
2021 Counselling: नीट पीजी काऊन्सेलिंगचे २०२१ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीद्वारे (Medical Counselling Committee)केली जाणार आहे. नीट पीजी २०२१ काऊन्सेलिंग वेळापत्रक एमसीसीने अधिकृत वेबसाइट mcc.nic.in जाहीर केले आहे. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. उमेदवार या लिंकवर क्लिक करून संपूर्ण समुपदेशन वेळापत्रक सहज डाउनलोड करू शकतात. काऊन्सेलिंग २४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये देशातील डीम्ड, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, AFMS NEET सहित ऑल इंडिया कोटा ५०% जागांसह MD, MS, Diploma, PG DNB अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश असेल. PG Counselling Schedule: महत्वाच्या तारखा २४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत - सीट मॅट्रिक्सची संस्थांद्वारे पडताळणी केली जाईल. तसेच सीट मॅट्रिक्स जाहीर केल्या जातील. कोणत्या वर्गात? कोणत्या कोर्समध्येय़ कोणत्या संस्थेत? किती जागा? हे जाणून घेण्यास उमेदवारांना मदत होईल. २५ ते २९ ऑक्टोबर (दुपारी १२ वाजेपर्यंत) - NEET PG काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी सुरू होईल. उमेदवारांना NEET PG किंवा MCC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करता येईल. पहिल्या फेरीसाठी निवड भरणे आणि लॉक करण्यासाठी २६ ते २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वेळ असेल. ०१ नोव्हेंबर ते ०२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत - पहिल्या फेरीसाठी जागा वाटप केले जाईल. सीट वाटपाचा निकाल ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर होईल. ०४ ते १० नोव्हेंबर २०२१ - पहिल्या फेरीसाठी जागा स्वीकारल्यानंतर, संस्थेत अहवाल, कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची प्रक्रिया केली जाईल. १२ ते ०२ डिसेंबर २०२१ - NEET PG काऊन्सेलिंगची दुसरी फेरी आयोजित केली जाईल. ०२ डिसेंबर २०२१ रोजी राज्य कोट्यातील रिक्त जागांचा तपशील दिला जाईल. दुसऱ्या फेरीनंतर मॉप-अप फेरी होईल. ही प्रक्रिया ०७ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२१ पर्यंत चालेल. राऊंड २ मध्ये नवीन जागा नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (एनबीई) च्या माहितीनुसार, नवीन एलओपी आणि मान्यता १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जाहीर केली जाईल. NEET PG काऊन्सेलिंग वेळापत्रक २०२१ सोबतच MCC ने यासंदर्भात एक नोटीस जाहीर केली आहे. फेरी १ मध्ये नसलेल्या काही नवीन जागा फेरी २ मध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी राऊंड १ निवड भरतीनुसार पुढील निर्णय घ्या आणि संस्थेला तशी सूचना द्या असा सल्ला उमेदवारांना देण्यात येत आहे. NEET PG काऊन्सेलिंग फेरी २ ही १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Zju02C
via nmkadda