Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-12T13:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET Result 2021: नीट यूजी प्रवेश परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या... Rojgar News

Advertisement
NEET Result 2021: राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे मेडीकल आणि बीडीएस प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG)-2021 निकालाच्या घोषणेसंदर्भातील अपडेट लवकरच जारी केले जाण्याची शक्यता आहे. परीक्षा पोर्टल, वर किंवा अधिकृत वेबसाइट, .ac.in वर निकालासंदर्भातील माहिती जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी वेबसाइटवर नियमितपणे भेट देत अपडेट्स जाणून घ्यावेत. एनटीएने प्रवेश परीक्षेचे आयोजन १२ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरात आणि परदेशातही विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. नीट २०२१ परीक्षेत सुमारे १६ लाख उमेदवार सहभागी झाले होते. आतापर्यंतचे अपडेट जाणून घ्या... सप्टेंबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात नीट यूजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर परीक्षेच्या निकालासंदर्भातील घोषणा सप्टेंबर अखेरपर्यंत केली जाणार होती. मात्र, या दरम्यान, एनटीएने नीट २०२१ साठी अर्जाची दुसरी फेरी सुरू केली. दुसऱ्या टप्प्यातील रजिस्ट्रेशनसाठी अॅप्लिकेशन विंडो १ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत खुली करण्यात आली होती. यानंतर या अर्जांमधील दुरुस्तीसाठी उमदेवारांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याने दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५० पर्यंत ही विंडो दुरुस्तीसाठी अॅक्टिव्ह असणार आहे. यानंतर आता एनटीएद्वारे निकालाच्या घोषणेबाबत अपडेट येऊ शकते असं म्हटलं जात आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की नीट यूजी 2021 निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची प्रोव्हिजनल ‘आंसर की’ जारी करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lzPYXo
via nmkadda