NEET Result 2021: नीट परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा वाढली; SC तील सुनावणी गुरुवारी Rojgar News

NEET Result 2021: नीट परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा वाढली; SC तील सुनावणी गुरुवारी Rojgar News

सर्वोच्च न्यायालयात 2021 परीक्षेवरील 'तातडीची सुनावणी' गुरुवारी, २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. NEET परीक्षेत बसलेल्या दोन उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका बुधवारच्या सुनावणीनंतर गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) NEET UG 2021 परीक्षेच्या निकालाबाबत बुधवारच्या या सुनावणीनंतर अपडेट करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, गुरुवारपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्यानंतर, परीक्षेला बसलेल्या १६ लाखांहून अधिक उमेदवारांची NEET निकालाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. NEET परीक्षेवर 'तातडीची सुनावणी' खरं तर, NTA ने सोमवारी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी NEET UG 2021 बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या २० ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्याची बुधवारी सुनावणी होणार आहे. NTA ने सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणी 'तातडीची सुनावणी' घेण्याची विनंती केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. NEET 2021 चा निकाल तयार होता, मात्र मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर निकालाची घोषणा रोखण्यात आली. मेहता यांनी असा युक्तिवाद केला की देशभरातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल अशा पद्धतीने रोखला जाऊ शकत नाहीत. एजन्सीकडून सांगण्यात आले की १२ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती आणि निकालाला आधीच खूप उशीर झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला उशीर झाल्याने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही विलंब होणार आहे. त्यावर विभागीय खंडपीठाने विधी अधिका-यांना या प्रकरणाची सुनावणी विभागीय खंडपीठासमोर 'तातडीच्या सुनावणी'साठी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vNylqH
via nmkadda

0 Response to "NEET Result 2021: नीट परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा वाढली; SC तील सुनावणी गुरुवारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel