NEET रिझल्ट येण्याआधी जाणून घ्या देशातील टॉप २० मेडिकल कॉलेजची यादी Rojgar News

NEET रिझल्ट येण्याआधी जाणून घ्या देशातील टॉप २० मेडिकल कॉलेजची यादी Rojgar News

Top Medical Colleges List: राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) NEET २०२१ चा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर करेल. पण NEET च्या निकालापूर्वी देशातील टॉप २० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गणल्या जाणाऱ्या संस्थांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला भारतातील टॉप २० वैद्यकीय महाविद्यालयांची यादी देत आहोत. ही यादी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या NIRF रँकिंग २०२१ वर आधारित आहे. भारत सरकारने अनेक बाबी लक्षात घेऊन NIRF रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगनुसार देशातील सर्वोत्तम २० वैद्यकीय महाविद्यालयांची यादी पुढे देण्यात आली आहे. रँकनिहाय महाविद्यालयांच्या नावासह त्यांना मिळालेले गुण देखील पुढे देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी (सर्वोत्तम खासगी वैद्यकीय महाविद्यालय) आणि सरकारी (सर्वोत्कृष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) दोन्ही संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील टॉप २० वैद्यकीय महाविद्यालयांची यादी रँक १. एम्स नवी दिल्ली - स्कोअर ९२.०७ रँक २. PGIMER, चंदीगड - स्कोअर ८२.६२ रँक ३. क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर - स्कोअर ७५.३३ रँक ४. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स (NIMHNS), बंगलोर - स्कोअर ७३.४५ रँक ५. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS), लखनऊ - स्कोअर ७२.४५ रँक ६. अमृता विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर - स्कोअर ६९.२५ रँक ७. बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू), वाराणसी - स्कोअर ६७.६२ रँक ८. JIPMER, पुद्दुचेरी - स्कोअर ६७.४२ रँक ९. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊ - रँक ६४.६७ रँक १०. कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल - स्कोअर ६३.६० रँक ११. श्री चित्र तिरुणन इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, तिरुअनंतपुरम - स्कोअर ६३.०४ रँक १२. इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस., नवी दिल्ली - स्कोअर ६१.२९ रँक १३. सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बंगलोर - स्कोअर ६०.८३ रँक १४. श्री रामचंद्र उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, चेन्नई - स्कोअर ५८.९२ रँक १५. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU), अलीगढ - स्कोअर ५८.१० रँक १६. मद्रास मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल, चेन्नई - स्कोअर ५७.८८ रँक १७. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, दिल्ली - स्कोअर ५६.३५ रँक १८. वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली - स्कोअर ५६.२० रँक १९. डॉ. डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे - स्कोअर ५५.९६ रँक २०. SRM विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, चेन्नई - स्कोअर ५५.७४ नीट यूजी निकाल २६ ऑक्टोबरनंतर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (यूजी) - २०२१ च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मडिकल आणि डेंटल कोर्सेजमध्ये प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेंस (यूजी) -२०२१ म्हणजेच नीट (यूजी) २०२१ साठी अर्ज सुधारणा विंडो पुन्हा एकदा खुली केली आहे. यामुळे उमेदवारांना अर्जातील त्रुटी सुधारता येणार आहेत. २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात करेक्शन करण्यासाठी विंडो खुली राहणार आहे. अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अर्जातील करेक्शन झाल्यानंतर एनटीएकडून नीट रिझल्ट २०२१ ची घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. नीट यूजी २०२१ अर्जात करा सुधारणा ज्या उमेदवारांना नीट यूजी २०२१ च्या अर्जात सुधारणा करायची आहे त्यांनी परीक्षा पोर्टलवर जाऊन होमपेजवर दिल्या गेलेल्या अॅप्लीकेशन करेक्शनच्या लिंकवर क्लिक करा. पुन्हा नव्या पेजवर अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करा. उमदेवार आपल्या अर्जामध्ये आवश्यक सुधारणा करु शकतात. NTA द्वारे जारी NEET (UG) 2021 अर्ज सुधारणा संदर्भातील नोटीसनुसार, उमेदवारांना त्यांच्या अर्जाच्या काही तपशीलांमध्ये सुधारणा किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी आहे. या तपशीलांमध्ये पहिल्या टप्प्यातील तपशील-लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल पत्ता, श्रेणी, उपश्रेणी तसेच फेज II मध्ये सादर केलेल्या सर्व तपशीलांचा समावेश आहे. उमेदवारांसाठी अर्ज दुरुस्ती करण्याची शेवटची संधी असेल. नीट यूजी २०२१ निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3prvBhm
via nmkadda

0 Response to "NEET रिझल्ट येण्याआधी जाणून घ्या देशातील टॉप २० मेडिकल कॉलेजची यादी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel