NEET २०२१ निकाल तयार; सर्वोच्च न्यायालयाच्या 'तातडीच्या सुनावणी'नंतर होणार घोषणा Rojgar News

NEET २०२१ निकाल तयार; सर्वोच्च न्यायालयाच्या 'तातडीच्या सुनावणी'नंतर होणार घोषणा Rojgar News

NEET Result 2021: वैद्यकीय आणि दंत पदवीपूर्व प्रवेश परीक्षा नीट यूजी २०२१ मध्ये बसलेल्या देशभरातील १६ लाखांहून अधिक उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (UG) २०२१ म्हणजेच नीट २०२१ परीक्षा आयोजित करणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () निकाल तयार केला आहे. नीट निकाल २०२१ जाहीर करण्यापुर्वी एजन्सीने संबंधित प्रकरणाच्या 'तातडीच्या सुनावणी'साठी सर्वोच्च न्यायालयात संपर्क साधला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षेत बसलेल्या दोन उमेदवारांसाठी पुनर्चाचणी घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या २० ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात २५ ऑक्टोबर २०२१ रोजी अपील याचिका दाखल केली आहे. ज्याच्या तात्काळ सुनावणीसाठी एनटीएने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रामना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर एनटीएतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार म्हणाले की, एजन्सी नीट २०२१ चा निकाल जाहीर करण्यास तयार आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत निकालाची घोषणा रोखण्यात आली आहे. यानंतर देशभरातील १६ लाखांहून अधिक उमेदवारांचे निकाल रोखले जाऊ शकत नाहीत असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल यांनी केला. एजन्सीकडून सांगण्यात आले की, १२ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती आणि निकालास आधीच उशीर झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला उशीर झाल्याने यूजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही विलंब होणार आहे. त्यावर विभागीय खंडपीठाने विधी अधिकाऱ्यांना हे प्रकरण 'तातडीच्या सुनावणी'साठी विभागीय खंडपीठासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत. नीट २०२१ संबधीत प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर याच आठवड्यात नीट यूजी निकाल २०२१ जाहीर होईल. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना नीट २०२१ चा निकाल आणि स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर पाहता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mfYb3g
via nmkadda

0 Response to "NEET २०२१ निकाल तयार; सर्वोच्च न्यायालयाच्या 'तातडीच्या सुनावणी'नंतर होणार घोषणा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel