NEET UG २०२१ अर्जामध्ये दुरुस्ती करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती Rojgar News

NEET UG २०२१ अर्जामध्ये दुरुस्ती करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती Rojgar News

NEET 2021: पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत प्रवेश परीक्षा 'नीट यूजी २०२१' च्या अर्जात सुधारणा करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२१ ही शेवटची संधी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी () द्वारे रात्री ११.५० वाजता नीट यूजी २०२१ च्या अर्जातील दुरुस्तीची विंडो बंद केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या २०२१ मध्ये सुधारणा करायच्या आहेत ते परीक्षा पोर्टल, neet.nta.nic.in वर सक्रिय केलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात. अर्ज दुरुस्ती विंडोच्या कालावधीबाबत उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्या होत्या. त्या लक्षात घेऊन नीट यूजी २०२१ अर्जामध्ये पहिल्या टप्प्यात भरल्या गेलेल्या मर्यादित तपशीलामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्व तपशीलांमधील त्रुटी सुधरणा करण्यासाठी अर्ज दुरुस्ती विंडो खुली करण्यात आली. २१ ऑक्टोबरला नोटीस जाहीर करुन अर्ज दुरुस्ती विंडो खुली आली होती. एनटीद्वारे फेज १ मधील नीट यूजी २०२१ च्या अर्जामध्ये लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल पत्ता, श्रेणी, उप-श्रेणी यामध्ये दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. तसेच फेज २ मध्ये भरलेल्या सर्व तपशीलांच्या दुरुस्त्या किंवा त्रुटी सुधारता येणार आहेत. ही प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करावे लागेल. पुन्हा परीक्षेची मागणी फेटाळली मेडीकल आणि डेंटल प्रवेश परीक्षा नीट २०२१ रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने, झालेल्या सुनावणी दरम्यान NEET UG 2021 परीक्षेत बसलेल्या १३ उमेदवारांच्या वकील ममता शर्मा यांच्यामार्फत दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. नीट यूजी २०२१ परीक्षेत सहभागी १३ उमेदवारांनी वकील ममता शर्मा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील NEET UG 2021 परीक्षेच्या पेपर लीकची कथित प्रकरणे आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय तथ्य शोध अहवाल लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली आहे. नीट यूजी २०२१ रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने निरीक्षण नोंदविले. त्यानुसार बनावट उमेदवारांचा समावेश आणि कागदपत्रे फुटल्याच्या कथित घटनांमुळे इतर लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाऊ शकत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, NEET परीक्षेत बनावट उमेदवारांना सामील करून आणि विविध कोचिंग सेंटर आणि पेपर सोडवणाऱ्या टोळ्यांकडून प्रत्येक उमेदवाराकडून ५० लाखांची वसूली केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने चार जण आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3E7X5ge
via nmkadda

0 Response to "NEET UG २०२१ अर्जामध्ये दुरुस्ती करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel