NIOS तर्फे दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर Rojgar News

NIOS तर्फे दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर Rojgar News

NIOS Exam: एनआयओसने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार या परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने १३ ऑक्टोबरला ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. यानुसार इयत्ता दहावी, बारावी लेखी पेपर परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय परदेशी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ११ नोव्हेंबरपासून म्हणजेच एक दिवस अगोदर सुरू होईल. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ डिसेंबरपर्यंत तर परदेशी उमेदवारांची परीक्षा ६ डिसेंबरला संपेल. या व्यतिरिक्त, संस्थेने सर्व प्रादेशिक संचालकांना लेखी परीक्षेचे वेळापत्रक प्रादेशिक केंद्राच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे आणि स्थानिक दैनिकांमध्ये प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in आणि sdmis.nios.ac.in वर उपलब्ध आहे. या परीक्षेत बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असेल. या परीक्षांची नोंदणी जुलै-ऑगस्टमध्ये झाली होती. त्याच वेळी, जून २०२१ परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर करण्यात आला. शिवाय, एनआयओएसने अलीकडेच कनिष्ठ सहाय्यक आणि स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. एनआयओएसच्या या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ११५ पदांची भरती केली जाणार आहे. एनआयओएसने भरती २०२१ साठी १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vaqnY6
via nmkadda

0 Response to "NIOS तर्फे दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel