Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-29T10:43:46Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIOS तर्फे डीएलएड आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा नोंदणीसंदर्भात महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
NIOS : NIOS कडून डी.एल.एड आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम आणि D.El.Ed (ऑफलाइन) परीक्षांसाठी नोंदणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संस्थेने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, डी.एल.एड आणि व्होकेशनलचे विद्यार्थी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील परीक्षांसाठी विलंब शुल्काशिवाय अर्ज करू शकतात. यानंतर विद्यार्थ्यांना २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत प्रति विषय १०० रुपयाप्रमाणे विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षांसासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या DElEd आणि व्यावसायिक विद्यार्थांना NIOS द्वारे आणखी एक संधी दिली जाईल. विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत १५०० रुपयांच्या एकत्रित विलंब शुल्कासह परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. या स्टेप्स फॉलो करुन करा नोंदणी NIOS तर्फे D.El.Ed आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेला नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वर जा. विद्यार्थ्यांना नाव, ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉगिन करावे लागेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या परीक्षेसाठी नोंदणी करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा. विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क आणि विलंब शुल्क (लागू असल्यास) भरावे लागेल. जे ऑनलाइन पद्धतींद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे भरता येईल. ऑनलाइन माध्यमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीचे शुल्क NIOS द्वारे स्वीकारले जाणार नाही. परीक्षेच्या नोंदणीनंतर त्याची सॉफ्ट कॉपी विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करुन ठेवणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bnftFw
via nmkadda