Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-14T08:43:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NMC च्या निरीक्षणासाठी ५९ प्राध्यापकांना नंदूरबार येथे प्रतिनियुक्ती Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून (एनएमसी) नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या निरीक्षणासाठी राज्यातील विविध महााविद्यालयांतील तब्बल ५९ प्राध्यापकांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे आणि तातडीने हजर राहण्याचा फतवा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) काढला आहे. अर्थातच, संबंधित प्राध्यापकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेशही संबंधित महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना देण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण विभागातील उसनवारीची परंपरा अजूनही सुरुच असल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. नंदूरबार येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाले आहे. आता या महाविद्यालयाचे निरीक्षण 'एनएमसी'कडून होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळेच ही उसनवारीची कसरत थेट 'डीएमईआर'च्या पातळीवरुन होत आहे. त्यासाठी धुळे, औरंगाबाद, जळगाव, अंबाजोगाई, मुंबई, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ५९ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांना नंदूरबार येथील महाविद्यालयात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिनियुक्ती देण्यात आल्यामुळे मुळात नंदूरबार येथील महाविद्यालयात 'एनएमसी'च्या नियमानुसार किती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांचा तुटवडा आहे, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा तुटवडा असताना नंदूरबार येथील १०० विद्यार्थ्यांना कोणत्या गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण मिळत आहे, काय व कसे शिकवले जात आहे, असाही प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. निरीक्षणासाठी ही प्रतिनियुक्ती देण्यात आल्यामुळे निरीक्षणानंतर सर्व ५९ प्राध्यापक आपल्या मूळ महाविद्यालयात रुजू होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मोजक्या शिक्षकांमध्ये महाविद्यालय सुरू राहणार हेही स्पष्ट आहे. नंदूरबार येथील महाविद्यालयात एकही कायमस्वरुपी पद नसल्याचेही समोर येत आहे. अशा महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा संकोच होणार असेल तर उत्तम डॉक्टर घडणार तरी कसे, असाही प्रश्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात कसे चालणार कॉलेज? केवळ नंदूरबार येथील महाविद्यालयात अशी स्थिती नसून, विविध महाविद्यालयांमध्ये अशीच स्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ वैद्यकीय शिक्षक नव्हे तर लिपिक व इतर महत्वाच्या पदांचाही मोठा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. कायमस्वरुपी पदे भरली जात नसल्याचा फटका थेट वैद्यकीय शिक्षणाला बसत असूनही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्टच आहे. त्यात आता पुन्हा प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली आहे. मात्र सर्वस्तरीय व कायमस्वरुपी मनुष्यबळाचे काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या एकूणच प्रकारात वैद्यकीय शिक्षणाचा स्तर आणखी खालावू शकतो, याकडेही लक्ष वेधले जात आहे. औरंगाबादच्या २३ प्राध्यापकांचा समावेश नंदूरबार येथील महाविद्यालयात प्रतिनियुक्ती देण्यात आलेल्यांमध्ये औरंगाबाद येथील २३ प्राध्यापकांचा समावेश आहे. यामध्ये जीवरसायनसास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिपक बोकनकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. रविराज नाईक, औषधशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रझवी सैय्यद, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ़. कैलास झिने व सहाय्यक प्राध्यापक डॉ. कपिलेश्वर चौधरी, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनोद मुंदडा व डॉ. खाडीलकर, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रभाकर जिरवणकर व सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिल जोशी, बालरोगशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल सूर्यवंशी व डॉ. किर्ती गुजराथी, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अनंत बिडकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अन्सारी मोहम्मद व डॉ. पंकज वैरागड, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अन्सारी, कान-नाक-घसाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रमोद धनजकर, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमरनाथ अवरगावकर, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. श्रीनिवास गडप्पा व सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रविणकुमार ठाकरे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत पाचोरे व डॉ. दत्तात्रय गांगुर्डे, क्ष-किरणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत तितरे आणि दंतरोगचिकित्साशास्त्र विभागाच्या डॉ. शुभदा पवार यांचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YKZkqu
via nmkadda