NTSE Stage 2 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

NTSE Stage 2 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

Stage 2 : नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनने (National Talent Search Examination, NTSE) स्टेज २ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग, एनसीईआरटी (National Council of Educational Research and Training, NCERT) ने परीक्षेसाठी हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट वर जारी केले आहे. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्टेज २ परीक्षेला बसणारे उमेदवार २४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्टेज २ अधिकृत पोर्टल वर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. NTSE Stage 2 Admit Card 2021: हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी पुढील पद्धतीने स्टेप्स बाय स्टेप प्रक्रिया करा - नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट .nic.in वर जावे. यानंतर होमपेजवर, 'Admit Card for Stage 2 NTSE exam' असे लिहिलेल्या लिंक वर क्लिक करा. यानंतर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती देऊन लॉगइन करा. एनसीईआरटी द्वारे २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी तुमचे प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घ्या. एनटीएसई स्टेज 2 अॅडमिट कार्ड २०२१ कार्ड डाऊनलोड केल्यानंतर सर्व महत्त्वाचा तपशील काळजीपूर्वक वाचा. एखादी चूक असेल तर तत्काळ एनसीईआयटीला त्याची सूचना द्या. ही परीक्षा आधी १३ जून, २०२१ रोजी आयोजित केली जाणार होती. पण COVID-19 महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षेसंबंधी अधिक माहीतीसाठी विद्यार्थ्यांनी नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग, एनसीईआरटी की आधिकारिक वेबसाइट ncert.nic.in ला भेट द्यावी. या वर्षीच्या सुरुवातीला देशभरात आलेल्या करोाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fydtbt
via nmkadda

0 Response to "NTSE Stage 2 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel