TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ONGC मध्ये ३०० हून अधिक पदांची भरती, 'असा' करा अर्ज Rojgar News

ONGC recruitment 2021: ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत एकूण ३०९ पदांची भरती केली जाणा आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर नोटिफिकेशन तपासून अर्ज करू शकतात. शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओएनजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इंजिनीअरिंग आणि जिओ सायन्स विषयामध्ये गेट २०२१ स्कोरच्या माध्यमातून अर्ज करु शकतात. अर्ज शुल्क या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये असेल. तर अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. वयोमर्यादा अनारक्षित आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) वगळता सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. तर एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. तसेच ओईबी (नॉन-क्रीमी लेयर) साठी वयोमर्यादा ३३ वर्षे आणि एईई वगळता सर्व पदांसाठी (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी ३१ वर्षे वयोमर्यादा आहे. ONGC recruitment 2021: असा करा अर्ज पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर जा. करिअर टॅबवर क्लिक करा. त्यानंतर 'GATE 2021 स्कोअरद्वारे इंजिनीअरिंग आणि जियो सायन्स विषयांमध्ये जीटीची भरती' लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा नवीन अर्जावर क्लिक करा. GATE 2021 नोंदणी क्रमांक आणि मेल आयडी भरा. त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करा. आता अर्ज शुल्क भरा. यानंतर भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3auIij2
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या